ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा घडले असते भयानक...! अहमदनगरमधील कुठे घडली घटना...



 हिवरे बाजारच्या डोंगराला आग- 

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर -आदर्शगाव हिवरेबाजार येथील चाणकाईमाता मंदिराजवळील डोंगराला दिनांक २० मार्च २०२४ रोजी रात्री १० वाजता आग लागली. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरे बाजारमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित असल्याने काही मिनिटातच मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ व तरुण मंडळ तसेच ग्रामवन समितीचे सदस्य यांच्या अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.



रात्री आग लागण्याची हि दुसरी वेळ असून यापूर्वी दिनांक ७ मार्च २०२४ रोजी सुध्दा रात्रीच आग लागली होती.आगीत मोर ,हरणे, ससे,लांडगे व इतर वन्यजीव आपला जीव वाचविण्यासाठी धावत होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post