माय अहमदनगर वेब टीम
पुणे - आमदार नीलेश लंके यांनी बांध फोडलेला आहे. आता पाणी वहायला सुरूवात झालेली आहे. बांध फुटल्यामुळे हळूहळू अनेक जण बाहेर पडायला उत्सुक आहेत. त्यामुळेच बजरंगबप्पा यांच्या प्रवेशास जास्त महत्व आहे.
बीड जिल्हयातील मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात प्रवेश केला. या प्रवेशावेळीही आ. नीलेश लंके यांचीच चर्चा होती.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, शरद पवार यांच्याकडे लोक आशेने पाहत आहेत, पवार हेच देशातील बाजी पलटू शकतात असा विश्वास जनतेमध्ये आहे. शरद पवार यांच्यावर देशातील, राज्यातील जनतेचा विश्वास आहे. येणारी लोकसभा निवडणूक हातात घालून काम करू, ताकदीने लढू, चांगले काम करू लागलो तर मला खात्री आहे जगात अशक्य काहीही नाही. अनेक पक्षाचे लोक पवार यांना भेटत आहेत, पॅन्थर रिपब्लिकन पार्टीचे गंगाधर गाडे यांचे चिरंजिव डॉ. सिध्दांत गाडे आदींनी पवार यांची भेट घेत पवार यांना पाठींबा दर्शविला असल्याचे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
केंद्र सरकारने यापूर्वी अनेक आश्वासने देण्यात आली. ज्यांनी ही आश्वासने दिली त्यांना त्याचा विसर पडला. शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न मागच्या पाच वर्षात तयार झाले. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे अश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याच्यावर जीएसटी लावण्याचा कार्यक्रम झाला. १ लाख रूपयांचे खत खरेदी केले तर १८ हजार जीएसटीसाठी मोजावे लागतात. त्यानंतर सरकार त्या शेतकऱ्याला उपकार केल्यासारखे सहा हजार रूपये देते. शेतकऱ्याच्या एका खिशातून १८ हजार रूपये काढायचे आणि दुसऱ्या खिशात सहा हजार रूपये द्यायचे हे भारतातल्या शेतकऱ्यास कळालेले असल्याचे पाटील म्हणाले.
पवारांशेजारी बसले तरी कारवाई सुरू होते !
पवार साहेबांच्या शेजारी बसले तरी त्या व्यक्तीच्या अपात्रेतेची कारवाई लगेच सुरू होते. बजरंगबप्पा बसलेत त्यांच्या अपात्रतेची चर्चा होणार नाही कारण ते सदस्य नाहीत असे सांगत नीलेश लंके यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते असे सांगणाऱ्या अजित पवार यांना पाटील यांनी टोला लगावला.
Post a Comment