माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली माहिती दिली. मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा केल्यानंतर या जागा जाहीर करत असल्याचे ते म्हटले. गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढविणार याची चर्चा रंगली होती. अखेर काल निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वर्धा – अमर काळे
दिंडोरी – भास्करराव भगरे
बारामती – सुप्रिया सुळे
शिरूर – अमोल कोल्हे
अहमदनगर – निलेश लंके
गोविंदा माझ्यापेक्षा चांगला नट, पण…
जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी अभिनेते गोविंदा यांच्याबद्दल एक विधान केले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा जयंत पाटील यांना याबद्दल विचारण्यात आले. त्यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, मी चित्रपटसृष्टीत नसल्यामुळे गोविंदा हा माझ्यापेक्षा चांगला नट आहे. त्यात प्रश्नच नाही. पण तो जिंकून येणारा उमेदवार आहे का? याबद्दल मी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.
दरम्यान आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटानेही पत्रकार परिषद घेऊन जागावाटपावर भाष्य केले. अजित पवार गटाच्या वतीने शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आणि रायगड लोकसभा मतदारसंघासाठी सुनील तटकरे यांना याआधीच उमेदवारी जाहीर केली होती. आज अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातली परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय जाहीर केला.
Post a Comment