दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने नगरमध्ये घडला विचित्र प्रकार



माय अहमदनगर वेब टीम 

 अहमदनगर- दारू पिण्यासाठी व मटन आणण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने वडिलांना मारहाण केली. मारहाणीत वडिल विश्‍वनाथ बाबुराव पांडुळे (वय 52 रा. बारस्कर मळा, नगर) जखमी झाले आहेत. रविवारी (दि. 17) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

 जखमी विश्‍वनाथ पांडुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा अंबादास विश्‍वनाथ पांडुळे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री अंबादास याने वडिल विश्‍वनाथ यांच्याकडे दारू व मटन आणण्यासाठी पैशाची मागणी केली.

दरम्यान विश्‍वनाथ यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाल्याने त्यांनी मुलगा अंबादास याला पैसे देण्यास नकार दिला. त्याच रागातून अंबादास याने प्लायवुडचा तुकडा वडिल विश्‍वनाथ यांच्या डोक्यात घालून त्यांना जखमी केले. जखमी विश्‍वनाथ यांनी जिल्हा रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर काल, सोमवारी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post