भारताचा विजयी सिक्सर!; इंग्लंडचे आव्हान संपुष्टात..., कोणी केली धमाकेदार खेळी....

 


माय नगर वेब टीम 

लखनौ : रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने २२९ धावा केल्या होत्या. हे आव्हान फार मोठे नव्हते. पण भारताच्या गोलंदाजांनी यावेळी तिखट मारा केल्या आणि इंग्लंडच्या संघाला चांगलेच जखडून ठेवले होते. त्यामुळे भारताला या वर्ल्ड कपमधील सहावा विजय मिळवता आला. पण या सामन्यानंतर इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आले आहे का, याचे समीकरण आता समोर आले आहे. पण भारतीय संघाने मात्र सलग सहावा विजय साजरा केला आहे. भारताने या सामन्यात १०० धावांनी विजय मिळवला


भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी २३० धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान माफक वाटत होते. पण भारताच्या गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली आणि त्यामुळेच भारताला या सामन्यात विजय मिळवता आला. इंग्लंडने सुरुवात चांगली केली होती. पण पाचव्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने इंग्लंडला पहिला धक्का दिला. बुमराने यावेळी पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डेव्हिड मलानला १६ धावांवर असताना बाद केले. त्यानंतरच्या चेंडूवर बुमराने इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुटला बाद केले आणि इंग्लंडला सलग दुसरा धक्का दिला. त्यांनतर मोहम्मद शमीचा जलवा पाहायला मिळाला. कारण शमीने बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड केले. त्यानंतरच्या चेंडूवर शमीने सलामीवीर जॉनी बेअरस्टोला बाद केले आणि पुन्हा एकदा इंग्लंडला दुहेरी धक्का बसला. भारताला यावेळी पाचवी विकेट मिळवून दिली कुलदीप यादवने. कारण कुलदीपने यावेळी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला बाद केले आणि भारताला पाचवे यश मिळवून दिले. त्यानंतर काही वेळ लायम लिव्हिंगस्टोन आणि मोईन अली यांची चांगली भागीदारी पाहायला मिळाली. पण शमी पुन्हा एकदा गोलंदाजीला आला आणि त्याने मोईनला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले.



भारताचा हा सहावा विजय ठरला, तर इंग्लंडचा पाचवा पराभव ठरला. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ ५ सामने खेळला होता. या पाच सामन्यांपैकी इंग्लंडला फक्त एकच सामान जिंकता आला होता आणि चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या खात्यात फक्त दोन गुण होते. त्यावेळी इंग्लंडचा संघ हा गुणतालिकेत सर्वात खाली म्हणजेच १० व्या स्थानावर होता. सहाव्या सामन्यानंतर आता त्यांच्या खात्यात पाच पराभव आहेत आणि त्यांचे १० गुण होऊ शकत नाहीत. त्यामुळे इंग्लंडच्या संघाचे या वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post