डॉ. सचिन खेंगट आयुष ग्लोबल अवार्डने सन्मानित  माय नगर वेब टीम 

अहमदनगर -आयुष चिकित्सा क्षेत्रमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. सचिन खेंगट पाटील यांना आयुष ग्लोबल अवार्ड 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


दि. 29 ऑक्टोबर 2023 रोजी शिर्डी येथे पुष्पक रिसोर्टमध्ये आयुष ग्लोबल अवार्ड कार्यक्रम आयुष इंटरनेशनल मेडिकल एसोसिएशन (AIMA)& आयुष ग्लोबल मेडिकल एसोसिएशन (AGMA), तथा विस्तार केंद्र- राजकोट, एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. आयुष चिकित्सा क्षेत्रमध्ये उल्लेखनीय कार्यकरण्या बाबत डॉ. सचिन खेंगट पाटील यांना आयुष ग्लोबल अवार्ड 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमामध्ये एमएसएमई  राजकोट सेंटर द्वारा लिनसिक्स सिग्मा वर आधारित आयुष हॉस्पिटल वर्ल्ड क्लास पेशेंट केयर या विषयावर मुख्य अतिथि डॉ. प्रवीण जोशी यांनी संबोधित केले. यावेळी फिल्म स्टार देवदत्त नागे, डॉ. प्रवीण जोशी, विशेष अतिथी प्रणव पांड्या, फिल्म स्टार ऋतुजा वागवे, फिल्म स्टार सुयोग गोऱ्हे, तसेच टीम एआयएमए, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा अवॉर्ड देण्यात आला. आयुष ग्लोबल अवार्ड मिळाल्याबद्दल डॉ. सचिन खेंगट पाटील यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post