मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम, दिला 'हा' खणखणीत इशाराअंतरावाली सराटी

माय नगर वेब टीम

जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात (Antarwali Sarati Village) आज मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची सकल मराठा समाजाच्या (Maratha Samaj) वतीने जंगी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी राज्यभरातील मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाला आहे. यावेळी या विराट सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा एल्गार करत राज्य सरकारवर हल्ला चढवला...यावेळी बोलतांना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "आजचा दिवस हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आज घराघरातला मराठा आयुष्यभर छातीवर हात ठेवून या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार होतो, हे सांगेल, घराघरातील मराठा आरक्षणासाठी पेटून उठला आहे, असे म्हणत सरकारला उरलेल्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा," अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.तसेच यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे काही मागण्या देखील केल्या. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देऊन प्रत्येक मराठ्याचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा.कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी देण्यात यावी. मराठा समाजासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी, आणि कुटुंबाला सरकारी नोकरी द्यावी. दर दहा वर्षाला ओबीसी आरक्षण दिलेल्या बांधवांचा सर्व्हे करण्यात यावा. तो सर्व्हे करण्यात आलेला नाही. असा सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात. सरकारने मराठा समाजाला १० दिवसांत आरक्षण द्यावे. सारथीमार्फत पीएडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे सर्व प्रयत्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत. महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या. एनटी, व्हीजेएनटी प्रवर्गासारखे टिकणारे आरक्षण द्या, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली.0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post