अवघ्या चार तासात ATM चोरांना बेड्या, पोलिसांनी 'असा' केला पाठलाग



 कर्जत पोलीसांची कारवाई

माय नगर वेब टीम 

कर्जत -  अवघ्या चार तासात ATM चोरांना बेड्या ठोकण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.

प्घटनेची हकिगत की, दि. 3 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील राशिन शहरातील कर्जत- भिगवन जाणारे रस्तालगत दोशी पेट्रोलपंपाशेजारी ए. टी. एम. मशीन 05 ते 06 अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याची घटना घडली. सदर घटनेबाबत दत्तात्रय मारुती परहर रा. विठाईनगर कर्जत ता. कर्जत यांचे फिर्यादीवरुन कर्जत पोलीस स्टेशनला गु. रजि. नं. 634/2023 भा. द. वि. क. 395, 458, 457, 380, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 त्यामध्ये 4.67,000/- रुपये रोख रक्कम च 5,00,000/- रुपये किमतीचे एटीएम मशिन चोरीस गेले आहे. सदर बाबत माहिती कर्जत पोलीस स्टेशनला प्राप्त होताच पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांनी सदर घटनेबाबत नियंत्रण कक्ष अहमदनगर यांचे मार्फतीने नियंत्रण कक्ष सोलापुर, नियंत्रण कक्ष पुणे, नियंत्रण कक्ष बोड यांना तसेच व्हाट्सअप ग्रुपवर माहिती शेअर केली व आपापले हद्दीत नाकाबंदी लावणेबाबत कळविले. तसेच राशिन दुरक्षेत्र येथे रात्रगस्त करिता नेमलेले पोकों धस व होमगार्ड यांना करपडी फाट्याजवळ नाकाबंदी करणेबाबत आदेशित केले.

 पोकों धस व होमगार्डे केदारी हे नाकाबंदी करत असताना एटीएम चोरून नेणारी पिकअप त्यांना दिसली. त्यांनी सदरची पिकअप चेक केली असता त्यामध्ये एटीएम व आरोपी दिसले त्यापैकी पाठीमागे बसलेले आरोपी यांनी कोयता व काटी घेवून पोको धस यांचेवर उगारली ते मागे सरल्याने संधीचा फायदा घेवुन चोर पळून गेले. पोलीस निरीक्षक बळप यांनी स्वतः अधिकारी व अंमलदार यांचेसह घटना ठिकाणी भेट दिली, घटनेबाबत वरिष्ठांना माहिती दिली असता उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत विवेकानंद वाखारे, परि. पोलीस उपअधिक्षक अरुण पाटील यांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देवून सदर गुन्ह्याची उकल करण्याचे अनुषंगाने 04 पोलीस पथके तयार केली.

सदर एटीएम चोरीचे अनुषंगाने माढा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की, माढा पो. स्टे. हद्दीत काही ईसम लोंढेवाडी गावचे शिवारात एटीएम मशिन गैस कटरने कट करुन पैसे काढत आहेत. अशी माहिती मिळाल्याने माढा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी गेले असता, सदरचे ए. टी. एम. चोर तेथून पिकअपसह पळून जावु लागले. पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यांचा पिकअप वाकाव रेल्वे स्टेशन ता. माढा जि. सोलापुर येथील नाल्याखाली चिखलात फसल्याने ते पिकअप सोडुन उसाचे शेतात पळुन गेले. स्थानिक नागरिकांचे मदतीने पळुन गेलेल्या आरोपींपैकी अविनाश मारुती डंडे रा. उडेगाव ता. बार्शी जि. सोलापुर, सतीश शहाजी खांडेकर रा. वडनेर ता. परांडा जि. सोलापुर, महादेव नागेश उर्फ नागनाथ सलगर रा उंडेगाव ता. बार्शी जि. सोलापुर असे 03 आरोपी माढा पोलीसांनी पकडले. तसेच विधीसंघर्षीत बालक मिळुन आल्याने त्यास ज्युव्हेनाईल जस्टीस अॅक्ट चे नियमाप्रमाणे ताब्यात घेण्यात आले. तोपर्यंत कर्जत पोलीस स्टेशनचे निरीक्षक घनशाम बळप हे टीम सह माढा पोलीस स्टेशन जि. सोलापुर येथे पोहचले. त्यापाठोपाठ काही वेळाने स्थागुशा अहमदनगर येथील सपोनि थोरात व स्टाफ हे देखील माढा जि. सोलापुर येथे पोहचले. त्यांनी सदर आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी राशिन ता. कर्जत येथील एटीएम मशिन चोरी केल्याने कबुल केले.

त्यांचेकडे सदर एटीएम मशिन मधील चोरलेल्या रकमेपैकी 03 लाख 11 हजार 100 रुपये रोख रक्कम मिळुन आली सदरची रक्कम व गुन्ह्यात वापरलेला 04,00,000/- रुपये किमतीचा पिकअप, 05,00,000/- रुपये किमतीचे एटीएम मशिन असा एकुण 12,11,100/- रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्ह्याचे तपासकामी पो. उप निरी. सालगुडे यांनी सविस्तर पंचनामा करून जप्त केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो उप निरी. सालगुडे पोकों वैभव गांगडे हे करत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, परि, पोलीस उपअधिक्षक अरुण पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनशाम बळप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर ,स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, सुनील चव्हाण ,बबन मखरे,अमृता आढाव, चालक संभाजी कोतकर, पो. उप निरी अनंत सालगुडे, पो. उप निरी. मंगेश नागरगोजे, पो. उप निरी. प्रदिप बो-हाडे, पोना संभाजी वावळे, पोना पांडुरंग भांडवलकर, पोना रविंद्र वाघ, पोकों दिपक कोल्हे, महादेव कोहक, लक्ष्मण ढवळे, अर्जुन पोकळे, नितीन धस, मनोज मुरकुटे, विशाल क्षीरसागर, अमोल रायकर, मपोक राणी व्यवहारे माढा पोलीस स्टेशनचे पो. नि. खणदाळे पोकों संजय घोळवे अशांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post