गाडे भाजपवर बरसले, म्हणाले त्यांना आता...

 


"भाजपला पाडण्यासाठी लोकांमध्ये तीव्र असंतोष - साजन पाचपुते / रुईछत्तिशी येथे होऊ द्या चर्चा अभियान सत्राचे आयोजन

माय नगर वेब टीम 

अहमदनगर - नगर तालुक्यात सध्या ठाकरे शिवसेनेच्या वतीने होऊ द्या चर्चा अभियान हाती घेण्यात आले आहे. रुईछत्तिशी येथे अभियानाची सभा संपन्न झाली. भाजपने गेल्या १० वर्षापासून लोकांची केलेली दिशाभूल, अच्छे दिन , बेरोजगारी, वाढती महागाई यावर आधारित दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी भाजपचे चांगलेच वाभाडे काढले. जनतेचा दिशाभूल करणारे काय विकास करणार ! भाजपने वेळोवेळी लोकांची दिशाभूल केली आहे. सत्तेच्या जीवावर लोकांना वेठीस धरण्याचे काम भाजपने केले. येणाऱ्या आगामी सर्व निवडणुकात जनता यांना माफ करणार नाही. भाजपला घरी बसवण्याचे दिवस आले आहेत. प्रत्येक शिवसैनिकांनी भाजपच्या या फसव्या विचाराचा घरोघरी जाऊन प्रचार आणि प्रसार करावा असे आवाहन देखील गाडे यांनी केले.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला जनता कौल देणार असल्याने भाजपची पायाखालची वाळू सरकली आहे असेही गाडे म्हणाले.

          ३० सप्टेंबर पासून नगर तालुक्याच्या प्रत्येक गावात हे अभियान राबवले जात आहे.जनतेचा उत्स्फूर्त सहभाग मिळत असून जनतेच्या जीवावर आजपर्यंत तालुक्यात शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. भाजपने उज्वला गॅस , २०२२ पर्यंत प्रत्येकाला पक्की घरे , शेतीमालावर निर्यात शुल्क या सर्व गोष्टी फसव्या केल्या आहेत.जनता भाजपला पाडण्यासाठी मतदानाची वाट पाहत आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याची आपली भूमिका असेल असे शिवसेना उपनेते साजन पाचपुते म्हणाले. १२ गावात मोदींच्या योजनांविषयी माहिती घेतली असता कोणालाच लाभ मिळाला नाही असा अभिप्राय जनतेने दिला आहे असेही गाडे यांनी सांगितले यावेळी गावातील अनेक नागरिकांनी भाजपविषयी उघड नाराजी व्यक्त केली. कार्यक्रम प्रसंगी शिवसेना नेते साजन पाचपुते , युवा सेना दक्षिण जिल्हाप्रमुख सोमनाथ कांडके, दक्षिण उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले , नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, श्रीगोंदा तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे, नगर तालुका युवा सेना प्रमुख प्रविण गोरे, बिभीषण सपाटे,  राजकुमार गोरे, माणिक गोरे, रंगनाथ गोरे, सोमनाथ गोरे, प्रभाकर बोरकर, संजय नवसुपे, अजिनाथ हजारे, शरद गोरे, ऋषिकेश गोरे, आकाश गोरे व ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post