निंबळक फ्लाय ओव्हर चे काम डिसेंबर मध्ये होणार पूर्ण अजय लामखडे यांची अधिकाऱ्यांशी चर्चा ; काम लवकर करण्याची मागणी

माय अहमदनगर वेब टीम नगर तालुका-  नगर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील निंबळक चौकातील फ्लाय ओव्हरचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती युवा नेते अजय लामखडे यांनी दिली.

      बायपास रस्त्यावरील निंबळक चौकात फ्लाय ओव्हर करण्यासाठी निंबळक ग्रामपंचायतच्या वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. बायपास रस्त्याचे काम सुरू असल्याने निंबळक, खातगाव, हिंगणगाव, जखणगाव, खारे कर्जुने, इसळक तसेच परिसरातील आठ ते दहा गावातील नागरिकांना रस्त्याची समस्या भेडसावत आहे. एम.आय.डी.सी.मध्ये कामाला येणारे मजूर तसेच विविध कामासाठी नगर शहरात येणाऱ्या नागरिकांचे रस्त्या अभावी हाल होत आहेत. चौकात वाहतुकीचा खोळंबा देखील होत आहे.

        फ्लाय ओव्हरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी युवा नेते अजय लामखडे यांच्या नेतृत्वाखाली अशोक शिंदे, बाळासाहेब कोतकर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे, बाबासाहेब पगारे, अविनाश आळंदीकर यांच्या शिष्टमंडळाने कंपनीचे अधिकारी बी. एम. पाटील, जयेश ठक्कर यांच्याशी चर्चा करून परिसरातील गावच्या नागरिकांच्या समस्या सांगितल्या. रस्त्याअभावी नागरीक, विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यवसायिक यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे फ्लाय ओव्हरचे  काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

      कंपनी अधिकाऱ्यांनी फ्लाय ओव्हरचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करणार असल्याचे सांगितले. फ्लाय ओव्हरचेचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांची रस्त्याची समस्या मार्गी लागणार आहे. त्यामुळे निंबळक पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

____________

 निंबळकला मिळणार नवीन ओळख निंबळक चौकात फ्लाय ओव्हरचे काम झाल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. फ्लाय ओव्हर होण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. चौकातील फ्लाय ओव्हर मुळे निंबळक गावाला नवीन ओळख निर्माण होणार आहे.

..... सौ प्रियंका लामखडे ( सरपंच, निंबळक)

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post