आमदार लंके यांच्या प्रयत्नामुळे विजेचा प्रश्न लागणार मार्गी- लामखडे नगर तालुक्यात ८० डीपी मंजूर ; १३६ किलोमीटर लाईनचे होणार काम

माय अहमदनगर वेब टीम



 नगर तालुका-  नगर पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यासह नगर तालुक्यातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती निंबळक सरपंच सौ. प्रियंका अजय लामखडे यांनी दिली.

       महावितरणच्या आर डी एस एस योजनेअंतर्गत पारनेर नगर मतदारसंघात सिंगल फेज डीपी व लाईनच्या कामासाठी ३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदर काम मार्गी लावण्यासाठी आ. लंके यांनी महावितरण कडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून तब्बल ३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

       एकूण ३३६ डीपी मंजूर असून नगर तालुक्यात ८० डीपी मंजूर झालेल्या आहेत. तर सिंगल फेजसाठी ७९ किलोमीटर एल टी लाईन टाकण्यात येणार आहे. तसेच थ्री फेज साठी तालुक्यात ५७ किलोमीटर लाईन टाकण्यात येणार आहे. एकूण नगर तालुक्यात १३६ किलोमीटर लाईन साठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

          नगर तालुक्यात अकोळनेर, कामरगाव, सारोळा कासार, चास, विळद, गवळीवाडा, शिंगवे,  जखणगाव,  नेप्ती, पिंपळगाव, टाकळी खातगाव, निंबळक, अरणगाव येथे एकूण ८० डीपी मंजूर झालेल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे  निंबळक सरपंच प्रियंका लामखडे यांनी सांगितले.

______________



 आमदार लंके यांनी निंबळक गावासाठी आठ डीपी मंजूर केलेल्या आहेत. त्यामुळे निंबळक गावच्या विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. निंबळक ग्रामस्थांच्या वतीने आमदार लंके यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

..... प्रियंका लामखडे ( सरपंच, निंबळक)

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post