माय नगर वेब टीम
अहमदनगर – नगर तालुक्यातील वाळकी - येथील पत्रकार ज्ञानदेव गोरे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. तसे पत्र संस्थेच्या वतीने देण्यात आले आहे.
गोरे यांनी विकास पत्रकारिता करताना पर्यावरण संरक्षण, संवर्धन व तत्संबंधी केलेले जनजागृती व वृक्षारोपण आणि संवर्धन या कार्याची राज्य पातळीवर दखल घेऊन मंडळाचे राज्य अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी सन २०२३ ते २०२६ या कालावधी करता त्यांची राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड केली आहे. निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Post a Comment