माय नगर वेब टीम
अहमदनगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार… सत्ता परिवर्तन होणार… महाविकास आघाडी खाते उघडणार… अशा अनेक चर्चा निवडणूक जाहीर झाल्यापासून तालुक्यात सुरू होत्या. परंतु आजच्या निकालाने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. बाजार समितीच्या निकालात कर्डिले -कोतकर गटाने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत सलग चौथ्यांदा बाजार समितीची सत्ता काबीज केली आहे. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानिपत झाले.
महाविकास आघाडी तसेच कर्डिले- कोतकर गटाने बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आरोप प्रत्यारोप होत होते. महाविकास आघाडीने कर्डिले गटाविरोधात भ्रष्ट कारभारावरून रान उठवत परिवर्तनाची साद घातली होती. परंतु मतदारांनी महाविकास आघाडीला नाकारल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या प्रा. शशिकांत गाडे यांना आमदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, घनश्याम आण्णा शेलार यांची मदत मिळाली. परंतु त्यांचाही प्रभाव मतदारांवर पडला नाही. याउलट जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व खासदार सुजय विखे यांनी भानुदास कोतकर, आमदार बबनराव पाचपुते यांच्या साथीने प्रचाराचे योग्य नियोजन याचा निश्चित फायदा निवडणुकीत झाल्याचे दिसून आले.
निवडणुकीत १८ च्या १८ जागा जिंकत जिल्हा बँकेंचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाने नगर तालुका महाविकास आघाडीचा पराभव केला. व्यापारी मतदारसंघातील कर्डिले- कोतकर गटाच्या दोन जागा याआधीच बिनविरोध निवडुन आल्या होत्या. उर्वरीत १६ जागांसाठीची मतमोजणी आज पार पडली. मतमोजणीत सेवा संस्थेच्या ११ पैकी ११ जागा कर्डिले गटाने जिंकल्या. महाविकास आघाडीचे संदेश कार्ले यांचा ५९ मतांनी पराभव झाला. ग्रामपंचायतच्या चारही जागांवर भाजपने विजय मिळवला . तर हमालमापाडी मधून भाजपच्या निलेश सोनवणे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादित केला.
भाजपचे विजयी उमेदवार व पडलेली मते
सेवा संस्था ( सर्वसाधारण ) =
राजेंद्र आंबेकर – ७०७
संजय गिरवले-७४३
सुभाष निमसे -७०८
सुधीर भापकर -७६१
भाऊसाहेब भोर -७०८
मधुकर मगर – ७२२
रभाजी सूळ – ७०१
महिला राखीव =
मनिषा घोरपडे -७९२
आंचल सोनवणे – ७६३
इतर मागासप्रवर्ग =
संतोष म्हस्के – ७७१
वि . जा . भ .ज. =
धर्मनाथ आव्हाड -८०९
ग्रामपंचायत सर्वसाधारण =
हरिभाऊ कर्डिले – ५४५
भाऊसाहेब बोठे-५३७
दुर्बल घटक =
दत्ता तापकिरे – ५४२
मागासवर्गीय =
भाऊसाहेब ठोंबें- ५४०
हमाल मापाडी =
निलेश सातपुते – २२६
महाविकास आघाडीचे पराभुत उमेदवार व मते –
सेवा संस्था सर्वसाधारण =
रोहिदास कर्डिले – ६१३
संदेश कार्ले – ६४२
भाऊसाहेब काळे -५४४
विठ्ठल दळवी – ५१६
उध्दव दुसुंगे -५७०
संपतराव म्हस्के -५२८
अजय लामखडे – ५०४
महिला राखीव=
संगिता ठोंबरे – ५९३
जयश्री लांडगे – ५५४
इतर मागास वर्गीय =
शरद झोडगे- ६०१
वि .जा.भ.ज. =
विठ्ठल पालवे -५५७
ग्रामपंचायत ( सर्वसाधारण ) =
अंकुश शेळके – ४५७
शरद पवार – ३८८
दुर्बल घटक =
प्रविण गोरे – ४३३
मागासवर्गीय =
सुरेखा गायकवाड – ४३०
हमाल मापाडी =
किसन सानप – ३५
Post a Comment