माय नगर वेब टीम
श्रीगोंदा तालुका - श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सोसायटी मतदारसंघातील शेतकरी विकास पॅनलचे युवा उमेदवार बाबासाहेब जगताप यांना तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बाबासाहेब जगताप हे अरुणकाका जगताप तसेच सचिनभाऊ जगताप यांचे यांचे विश्वासू मानले जातात.
श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवारांना चिन्ह वापट झाले असून उमेदवार मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत. शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना कपबशी चिन्ह मिळाले आहे. दरम्यान, तालुका बाजार समिती निवडणूक जाहीर झाल्यापासूनच शेतकरी प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब जगताप यांची उमेदवारी चर्चेत होती. तसेच त्यांची उमेदवारी अंतीम मानली जात होती. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याच्या पहिल्या दिवसापासून संपूर्ण तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत (दि.20 एप्रिल) तालुक्यातील गावागावात जाऊन त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. शुक्रवारी चिन्ह वाटप झाले. बाजार समितीच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बाबासाहेब जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
मतदारांच्या भेटी दरम्यान आगामी काळातील बाजार समिती कशी असेल याचे व्हिजन मतदारांसोर ते मांडत आहेत. तसेच शेतकरी विकास पॅनलचा जाहीरनामा मतदारांसोर ते मांडत आहेत. विधानपरिषद सदस्य अरुणकाका जगताप, दादासाहेब जगताप तसेच सचिनभाऊ जगताप यांचे तालुक्यातील संबंध निश्चितच बाबासाहेब जगताप यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत.
येथील निवडणूक तरुण तसेच नागरीकांनी हातात घेतली असुन जगताप यांच्या प्रचारात नागरीक तसेच मतदार स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. माजी आमदार राहुल जगताप, अरुणकाका जगताप, बाळासाहेब नाहटा, आण्णासाहेब शेलार, दिलीप पाटील भोसले, दादासाहेब जगताप, सचिनभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.
बाबासाहेब जगताप यांनी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीत शेतकरी हितासाठी तसेच बाजार समितीच्या विकासासाठी पारदर्शक काम करणार असल्याचे सांगितले. बाबासाहेब जगताप यांचा तालुक्यातील जनसंपर्क, मित्र परिवार तसेच नातेसंबंध पथ्यावर पडणार असल्याचे बोलले जात आहे.
___________________________
बाबासाहेब जगताप यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान राहिलेले आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात बाबासाहेब जगताप हे नेहमीच अग्रेसर राहत असत. गोरगरीब जनतेला मदत करण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे. त्यामुळे मांडवगण गटातील सर्व मतदार व जनतेने त्यांच्या प्रचारात सक्रिय होऊन शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा विडा उचलला आहे. बाबासाहेब जगताप यांनी मतदार व नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तर मतदारांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून कामकाज करणार असल्याची माहिती बाबासाहेब जगताप यांनी दिली.
____________________________
Post a Comment