नगर तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी शशिकांत पवार

 


अध्यक्षपदी नागेश सोनवणे /कार्याध्यक्षपदी बाळासाहेब गदादे

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर : नगर तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी पुढारीचे तालुका प्रतिनिधी शशिकांत पवार तर अध्यक्षपदी लोकमतचे वार्ताहर नागेश सोनवणे तर सचिवपदी सकाळचे उपसंपादक नवनाथ खराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.



तालुका पत्रकार संघाची बैठक जेष्ठ पत्रकार व पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष लहुकुमार चोभे ( तालुका प्रतिनिधी सार्वमत ) यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी दुपारी पार पडली. यात संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. संघाच्या उपाध्यक्षपदी पुढारीचे तालुका प्रतिनिधी शशिकांत पवार तर कार्याध्यक्षपदी पुण्यनगरीचे पत्रकार बाळासाहेब गदादे यांची निवड करण्यात आली. खजिनदार पदी लोकमतचे वार्ताहर शरद कासार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नितीन देशमुख (सकाळ), माजी अध्यक्ष जितेंद्र निकम (तालुका प्रतिनिधी दिव्य मराठी), माजी अध्यक्ष योगेश गुंड(तालुका प्रतिनिधी लोकमत), पत्रकार देविदास गोरे आदि उपस्थीत होते. नव्या कार्यकारिणीचे पत्रकार संघाचे मार्गदर्शक लोक आवाज चे संपादक विठ्ठल लांडगे, पुण्यनगरी चे कार्यकारी संपादक राजेंद्र झोंड, पुढारी चे उपसंपादक ज्ञानेश्वर निमसे यांनी अभिनंदन केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post