खडकीत रंगला कुस्त्यांचा आखाडा

 


माय नगर वेब टीम 

अहमदनगर - नगर तालुक्यातील खडकी येथे दावल मलिक बाबा यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांचा हगामा चांगलाच रंगला. युवा महाराष्ट्र केसरी पै. विष्णू खोसे यांच्या मार्गदर्शनाखाली हगामा मोठया उत्सहात पार पडला.

खडकी येथे मंगळवारी दावल मलिक बाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्सहात पार पडला. यात्रेनिमित्त पाहिल्यांदाच बुधवारी कुस्ती हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते. युवा महाराष्ट्र केसरी पै. विष्णू खोसे, सरपंच प्रविण कोठुळे यांच्या हस्ते कुस्ती लावून कुस्त्यांना प्रारंभ झाला. हरीयाणा, दिल्ली, सारोळा, हिवरे, नगर यांसह अनेक ठिकाणावरून मल्लानी हजेरी लावली. चित्तथरारक कुस्त्यांनी हगामा चांगलाच रंगला. सुमारे एक लाखापेक्षा अधिक रकमेची बक्षिसे देण्यात आली. मुलींच्या कुस्त्यांनी हगाम्याला आणखीनच रंगत आली. 

हगामा यशस्वीतेसाठी सरपंच प्रविण कोठूळे, माजी सरपंच शरद कोठुळे, उपसरपंच अदिनाथ गायकवाड, बाबुर्डी बेंदचे माजी उपसरपंच संदीप चोभे, युनुस आत्तार, चंद्रकांत कोठुळे मेजर, नवनाथ रोकडे, भाऊ बहिरट, राहूल निकम, माजी सरपंच सुनिल नेते, वाबळे सर, रतन बहिरट, अमृता कोठुळे, आबा कोठुळे, मतीन शेख, सोनू शेख, सुनिल मोरे व इतर मान्यवरांनी प्रयत्न केले. यावेळी पंचक्रोशीतील कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित मोठे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post