नगरमध्ये मिळणार विविध खेळांचे प्रशिक्षण ! सावेडी येथील यशश्री प्री-स्कूलच्या प्रांगणात होणार प्रशिक्षण केंद्र अनुभवी क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन नगरकरांसाठी ठरणार अभिमानाची बाब

 माय अहमदनगर वेब टीम 


 नगर तालुका (शशिकांत पवार)- नगर येथील सावेडी उपनगरात विविध खेळांचे प्रशिक्षण केंद्र रविवार दि. २२ जानेवारीपासून सुरू होत आहे. अनुभवी क्रिडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळांचे प्रशिक्षण केंद्र नगर मध्ये प्रथमच सुरू होत असल्याने ही बाब नगरकरांसाठी निश्चितच समाधानाची आहे.

      यशश्री प्री-स्कूल सावेडीच्या प्रांगणात यश क्रिएटिव्हचे अध्यक्ष यश शर्मा यांच्या सहकार्यातून अनुभवी क्रिडा प्रशिक्षक राजेंद्र पवार, महेश आनंदकर, ऋषिकेश घोडेकर, स्नेहल धस यांच्या माध्यमातून विविध खेळांच्या प्रशिक्षण केंद्रास सुरुवात होत आहे. 

     विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच आरोग्यासाठी मैदानी खेळ हे महत्त्वाचे आहेत. प्रशिक्षण केंद्रात मनोरंजनात्मक खेळ, फिजिकल फिटनेस, स्व-संरक्षण, अँथलेटीक्स, लाठीकाठी, तलवारबाजी, एरोबिक्स याबरोबर विविध खेळांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे मुलींसाठी  स्वतंत्र महिला प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.



     याबाबत बोलताना क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र पवार यांनी सांगितले की, खेळामुळे विविध फायदे होत असतात. वजन कमी करणे, उंची वाढवणे, आत्मविश्वास वाढवणे, एकाग्रता साध्य करणे, स्वबळ व प्रतिकारशक्ती विकसित करणे, शारीरिक लवचिकता आणि सुदृढ आरोग्य यासाठी खेळ आवश्यक आहेत. 




        प्रशिक्षण केंद्रात दोन वर्षे वयापुढील सर्वांना प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र पवार (98 22 75 61 82 ) महेश आनंदकर (97 30 03 75 55 )ऋषिकेश घोडेकर (70 30 80 52 93) स्नेहल धस (90 22 39 54 08) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नगरकरांनी प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

_____________________________

 नगरकरांसाठी सुवर्णसंधी 

मोबाईलच्या काळात मैदानी खेळ लोप पावत चालले आहेत. त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर होत असतात. खेळातही मुलांचे 'करिअर' घडू शकते. अभ्यासाबरोबर खेळही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे नगरकरांसाठी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकतसेच विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण केंद्राचा लाभ घ्यावा.

.....  राजेंद्र पवार ( क्रिडा प्रशिक्षक)

_______________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post