राजकीय प्रतिमा मलीन करण्याची विरोधकांची खेळी ! युवा नेते अजय लामखडे यांचा आरोप ; 'त्या' प्रकरणाशी संबंध नाही

 माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका- राजकारणातील वाढते प्रस्थ तसेच गावामध्ये सुरू असलेली विविध विकास कामे अन् आगामी निवडणुकीतील उमेदवार यामुळेच आमची राजकीय प्रतिमा मलीन करण्यासाठी विरोधकांनी खेळी करून सरपंच सौ.प्रियंका लामखडे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले असल्याचा आरोप युवा नेते अजय लामखडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

     निंबळक गावच्या सरपंच प्रियंका लामखडे व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत अजय लामखडे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

     निंबळक परिसरात वाढते राजकीय प्रस्थ.. तरुणांचा वाढता पाठिंबा अन् गावात सुरू असलेली विविध विकास कामे हेच विरोधकांना खटकत होते. आगामी होणा-या निवडणुकीतील उमेदवार म्हणून माझी सुरू असलेली तयारी तसेच मीच उमेदवारी करावी हा जनतेचा आग्रह. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली होती. वाढता जनसंपर्क, नागरिकांच्या समस्यांचे आमदार निलेश लंके यांच्या मार्फत निराकरण करण्याचे कार्य त्यामुळे नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता निवडणुकीत पराभव करणे अवघड झाल्याचे चित्र समोर दिसत होते. त्यामुळे विरोधकांनी आमच्याविरुद्ध षडयंत्र रचून खोट्या गुन्ह्यात अडकून आमची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे.

        परंतु निंबळक गावातील तसेच तालुक्यातील जनतेला आमचे कार्य चांगलेच माहिती आहे. माझी आगामी उमेदवारीची तयारीच विरोधकांना रुचली नाही. त्यामुळेच आमच्या विरोधात राजकीय षडयंत्र रचले जात आहेत. विरोधकांनी रडीचा डाव खेळण्यापेक्षा निवडणुकीच्या मैदानात सरळ- सरळ लढावे त्यात विरोधकांना जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वासही अजय लामखडे यांनी व्यक्त केला.

      निंबळक गावचा विकास तसेच गटातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे कार्य अविरतपणे सुरूच ठेवणार आहे. तालुक्यात उभारते नेतृत्व म्हणून अजय लामखडे यांची निर्माण झालेली ओळख विरोधकांना पचणी पडली नाही.विरोधकांनी कितीही खेळ्या केल्या तरी त्यांचा डाव कदापि यशस्वी होणार नसल्याचेही लामखडे यांनी सांगितले.

_____________________________

आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास 

आमचा न्यायव्यवस्थेवर संपूर्णतः विश्वास असून सदर प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल. विरोधकांच्या दबाव तंत्राला बळी न पडता समाजसेवा व नागरिकांच्या हितासाठी कार्य करत राहणार आहे. तसेच जनहितासाठी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी घाबरणार नाही. गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे.

..... अजय लामखडे ( युवा नेते)

_________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post