संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत निंबळक येथील १६ महिलांना डोल सुरू

माय अहमदनगर वेब टीम


 नगर तालुका- संजय गांधी योजनेअंतर्गत, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निंबळक येथील सोळा महिलांना दरमहा १००० रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

     आमदार निलेश लंके व सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांच्या पुढाकारातून १६ महिलांना डोल मंजूर करण्यात आला आहे. डोल मंजूर करण्यासाठी आमदार निलेश लंके व सरपंच प्रियंका लामखडे यांचे मोठे सहकार्य लाभले असल्याची माहिती लाभार्थी महिलांनी दिली.

     निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठा आजार, घटस्फोटीत स्त्रिया, विधवा यांच्यासाठी संजय गांधी निराधार पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. लाभार्थी महिलांनी आमदार निलेश लंके व सरपंच प्रियंका लामखडे यांचे आभार मानले.

     यावेळी बोलताना सरपंच प्रियंका लामखडे यांनी संजय गांधी निराधार योजनेप्रमाणेच शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. तसेच शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत सदैव प्रयत्नशील असल्याचे सौ. लामखडे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post