यशवंतराव गाडे विद्यालयात मुलींची बाजी

 यशवंत गाडे विद्यालयात मुलींनी मारली बाजीनगर तालुका- : मुकुंदनगर ( फकिरवाडा ) येथील यशवंतराव गाडे माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७ .५० टक्के लागला असुन यात मुलीनींच बाजी मारली आहे . प्रेरणा प्रदीप केरूळकर हिने ७९.८० टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळवला .सैफअली युनुस सय्यद ७९ .६० टक्के गुण मिळवुन दुसरा तर हुजेबा जियाउद्दीन शेख व मिर अमिना अमीर सुलतान यांनी ७९ .२० टक्के गुण मिळवुन तिसरा क्रमांक मिळवला .९ मुलांना विशेष योग्यता तर ४८ मुलांना प्रथम श्रेणी मिळाली . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, सचिव प्रा . शशिकांत गाडे , सहसचिव रमाकांत गाडे , उपाध्यक्ष एम .पी.कचरे , खजिनदार संजय गाडे , मुख्याध्यापिका डॉ निशात शेख यांनी अभिनंदन केले .

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post