आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून निंबळक गावचा विकास- सरपंच प्रियंका लामखडे 'मोक्षरथ' लोकार्पण सोहळा संपन्न ; ग्रामस्थांची गैरसोय टळणार

माय अहमदनगर वेब टीम


नगर तालुका- आमदार निलेश लंके यांचे निंबळक गावावर विशेष प्रेम असून त्यांनी दिलेल्या भरीव निधीमधून निंबळक गावचा विकास झाला असल्याची माहिती सरपंच प्रियंका लामखडे यांनी दिली.

     निंबळक पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी लामखडे कुटुंबियांच्या वतीने स्वर्गीय माजी सरपंच विलासराव लामखडे यांच्या स्मरणार्थ 'मोक्षरथ' लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मोक्षरथ लोकार्पण सोहळा ह.भ.प. श्रीनिवास महाराज आळंदीकर यांच्या हस्ते, सरपंच प्रियंका लामखडे, युवा नेते अजय लामखडे तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

      त्याप्रसंगी बोलताना सरपंच प्रियंका लामखडे यांनी मोक्षरथ हा निंबळक परिसरातील सर्व ग्रामस्थांसाठी उपलब्ध राहणार आहे. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मोक्षरथ देण्यात आल्याचे लामखडे यांनी सांगितले. तसेच निंबळक गावासाठी आमदार निलेश लंके यांनी भरीव निधी दिला असून त्यातून गावांमध्ये विविध विकासाची कामे झाली आहेत. खंडोबा देवस्थान साठी भक्त निवास, पेव्हिंग ब्लॉक, स्ट्रीट लाईट, निंबळक मुख्य रस्ता स्ट्रीट लाईट असे विविध कामे आमदार लंके यांच्या माध्यमातून झाल्याची माहिती प्रियंका लामखडे यांनी दिली.

     यावेळी ह.भ.प. श्रीनिवास महाराज आळंदीकर यांनी लामखडे कुटुंब नेहमीच समाजसेवेत पुढाकार घेत असते. गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रा उत्सव निमित्ताने लामखडे कुटुंबियांच्या वतीने ग्रामस्थांसाठी मोक्षरथ देण्यात आला. त्याबद्दल लामखडे कुटुंबीयांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले. याप्रसंगी बाळकृष्ण त्रिंबक कोतकर, रावसाहेब जाजगे, अर्जुन दिवटे, लक्ष्मण होळकर, रावसाहेब खेसे, बाळासाहेब जाजगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post