गणित प्राविण्य परीक्षेत लिटिल वंडर्स स्कुलचे यश

माय अहमदनगर वेब टीम 

नगर तालुका--नगर तालुक्यातील जेऊर येथील शांतिनिकेतन संकुलातील लिटिल वंडर्स स्कूल अँड विजडम हायस्कूल मध्ये नुकत्याच झालेल्या गणित प्राविण्य परीक्षेत १३ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

      सदर परीक्षा ही महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांचे मार्फत घेण्यात आली होती. परीक्षेत विद्यालयाचे इयत्ता पाचवी चे ५ विद्यार्थी, इयत्ता सहावीचे चार तर इयत्ता आठवीचे चार विद्यार्थी अशा १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. सार्थक संतोष कदम या विद्यार्थ्यांने राज्य प्रज्ञा पात्र प्राविण्य संपादन केले असून पुढील परीक्षेत पात्र ठरला आहे.

     या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक के. व्ही. दुबे शिक्षिका सौ. आयशा शेख व सौ कल्पना वड्डेपल्ली यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेच्या संचालिका सौ. स्वाती चेमटे तसेच जेऊर ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

__________________


नवनवीन उपक्रम राबविण्यात अग्रेसर विद्यालय

लिटिल वंडर्स स्कूल अँड विजडम हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहत आहे. जेऊर पंचक्रोशीत लिटिल वंडर्स स्कूल नावलौकिकास आले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यालयांमध्ये विविध स्पर्धा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.

......सौ. स्वाती चेमटे (संचालिका लिटिल वंडर्स स्कूल,जेऊर)

______________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post