महाराष्ट्र राज्य गवंडी समाज सेवा संघाच्या' अध्यक्षपदी अविनाश आळंदीकर

 'माय अहमदनगर वेब टीम

निंबळक ग्रामस्थांच्यावतीने युवा नेते अजय लामखडे यांच्या वतीने सत्कार

 नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक गावच्या सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन अविनाश आळंदीकर यांची महाराष्ट्र राज्य गवंडी समाज सेवा संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार निंबळक ग्रामस्थांच्या वतीने युवा नेते अजय लामखडे यांच्या हस्ते उपसरपंच बाळासाहेब कोतकर, घनश्याम आबा म्हस्के, रावसाहेब कोतकर, जयराम खेडकर, अशोक कळसे, सचिन राठोड यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

      महाराष्ट्र राज्य गवंडी समाज संघाची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. संघाच्या अध्यक्षपदी गवंडी समाजातील प्रतिष्ठित, दानशूर तसेच प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश आळंदीकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

      पंढरपूर येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आळंदीकर यांचे सामाजिक, शैक्षणिक तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची गवंडी समाज सेवा संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे निंबळक ग्रामस्थ व पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

________________________

 निंबळक गावचे भूषण आळंदीकर

 निंबळक गावातील सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन अविनाश आळंदीकर यांची महाराष्ट्र राज्य गवंडी समाज सेवा संघाचा अध्यक्षपदी निवड झाली असल्याने ही निवड गावासाठी अभिमानाची बाब आहे. निंबळक गावातून आळंदीकर हे करत असलेले सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निंबळक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा.

......अजय लामखडे (युवा नेते)

_________________

निंबळक ग्रामस्थांच्यावतीने झालेला सत्कार हा खूप प्रेरणादायी आहे. याच गावातून मी करत असलेल्या कार्याची दखल घेऊन माझी गवंडी समाज संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निंबळक ग्रामस्थांच्या सहकार्याने माझ्या हातून अधिक समाजसेवा कशी घडेल याचा मी प्रयत्न करणार आहे.

........ अविनाश आळंदीकर (अध्यक्ष, गवंडी समाज संघ)

---------------------------

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post