व्यापाऱ्यांचे प्रश्न आ. नितेश राणे यांनी घेतले हाती, म्हणाले...

 


माय अहमदनगर वेब टीम

नगरमध्ये कापडबाजारासह संपूर्ण बाजारपेठेत अनधिकृत व्यवसाय करणारे फेरीवाले, हातगाडीवाले यांच्या विरोधात अहमदनगर व्यापारी महासंघाने व्यापक लढा उभारला आहे. बाजारपेठ कायमस्वरुपी अतिक्रमणमुक्त रहावी तसेच दहशत निर्माण करून व्यापार्‌यांना त्रास देणार्‌या प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली आहे. नगर दौर्यावर आलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही व्यापार्‍यांना त्यांचा अतिक्रमण विषयी विशेष वेळ देऊन व्यापार्‌यांशी सविस्तर चर्चा करून अडीअडचणी समजून घेतल्या. कोणत्याही परिस्थितीत व्यापार्‌यांना त्रास होणार नाही यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरकार दरबारी आवाज उठवू अशी ग्वाही आ.राणे यांनी दिली, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी दिली.

आ.राणे यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी माजी खा.अमर साबळे, महासंघाचे उपाध्यक्ष अभिमन्यू जाधव, वंदे मातरम युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी किथानी, प्रतीक बोगावत, करण बंटी डापसे, महावीर उद्योग समूहाचे ओमप्रकाश बायड, दीपक चिंटू खंडेलवाल, सौरभ भांडेकर, संदीप बायड, कुणाल नारंग, आदित्य गांधी,सागर पेटकर, दीपक नवलानी, संजय बोगावत, किरण व्हरा, नेमू गोयल, विजय गुगळे, आनंद कृष्णनी, संतोष ठाकूर, रवी कराचीवाला, श्रीविशाल पतके, संतोष मिसाळ, विजय आहेर, गणेश गोयल, विक्रम नारंग, खानचंदाणी, धरम कांगला, विक्रम मुथा, संभव काठेड, रवी गांधी, गणेश म्हस्के,निक्की गोपलानी, ऋषी येवलेकर, मयूर फिरोदिया, हर्षल पेटकर, राहुल हसेजा, कमलेश आहुजा, रविराज रासने, बन्सी फूलडहाळे, सुशील ओस्तवाल,  आदी व्यापारी उपस्थित होते.

महासंघाच्या 29 मार्चच्या उपोषण आंदोलनानंतर महानगरपालिकेने तसेच प्रशासनाने बाजारपेठेतील फेरीवाले, हातगाडीवाले हटवले आहेत. मात्र आता काही हातगाडीवाले, पथारीवाले हे दुकानदारांना दमबाजी धाक दपटशही करून दुकानासमोर जागा देण्यास हरकत नसल्याचे दाखले बळजबरीने लिहून घेत आहेत. वास्तविक सार्वजनिक रस्ते महानगरपालिकेच्या अखत्यारित येत असताना अशा प्रकारे दुकानदारांना वेठीस धरुन ना हरकत दाखले घेण्याचा प्रकार बेकायदेशीर आहे. गेल्या काही वर्षात बाजारपेठेत दहशतीचे वातावरण तयार केले जात असल्याने अनेक मोठी दुकाने स्थलांतरित झाली आहेत. अनेक जण रोजच्या त्रासाला कंटाळून बाहेर जाण्याच्या मनस्थितीत आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त होवून नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने व्यापारी देशोधडीला लागण्याची चिन्हे आहेत. महावीर उद्योग समूहाचे ओमप्रकाश बायड यांच्या दुकानासमोरही अशाच प्रकारे हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. आ.राणे यांनी बायड यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेत कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असे सांगत संबंधित अतिक्रमण धारकांना समजही दिली. नगरची बाजारपेठ राज्यात प्रसिध्द असून येथील व्यापार्‌यांना विनाकारण त्रास होणार असेल तर या विरोधात आवाज उठविण्याची ग्वाही त्यांनी दिली. व्यापार्‍यांना जागेबाबत तक्रारी करण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत असे प्रतिपादन बजरंग दलाचे कुणाल भंडारी, वंदे मातरमचे प्रतीक बोगवत यांनी आ.राणे यांच्या निदर्शनास आणून दिले.  वंदे मातरमचे अध्यक्ष रवी किथानी यांनी व्यापार्‍यांना असेच कायमस्वरूपी सहकार्य करण्याचे आवाहन आ.राणे यांना केले. कापड बाजार श्री गणेश मित्र मंडळाचे चिंटू खंडेलवाल व भैय्या भांडेकर यांनी देखील सारडा गल्लीतील व्यापार्‍यांच्या समस्या मांडल्या.  या सर्व प्रकरणात मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांशी आ.राणे यांनी स्वतंत्र चर्चा केली.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post