अल्पवीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीस अटक



 कोपरगाव| शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका कॉलनीमध्ये दुपारी घरासमोर अंगणात खेळत असणाऱ्या एका पाच वर्षाच्या चिमुरडीला पैसे देतो असे आमिष दाखवून आरोपी दिलीप रामेश्वर पासवान याने घरात बोलावून त्या चिमुरडीबरोबर अनैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रविवार दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चिमुरडी आपल्या घरासमोर खेळत असताना आरोपी दिलीप रामेश्वर पासवान मूळ रा.कठणपूर, ता. बेडम, जि. रोहताज, बिहार (सध्या कोपरगाव शहर) याने तिस पैसे देण्याचे आमिष दाखवून घरात बोलावून त्या लहानग्या चिमुरडीबरोबर नैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अत्याचारित मुलीच्या आईने कोपरगाव शहर पोलिसांत फिर्याद दिली.

रविवारी रात्री उशिरा आरोपी विरोधात बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमव्दारे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली. सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ११ नोव्हेंबरपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई दाते करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post