भुसावळ। आगामी दीपावली, (Diwali) छटपुजासाठी (Chhatpuja) रेल्वे गाड्यांमध्ये (Trains) होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने नागपूर व करमळी, मुंबई तसेच पुणे व भगत की कोठी दरम्यान विशेष उत्सव ट्रेन (festivals special trains) चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष गाड्यांमध्ये - नागपूर-करमळी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष - गाडी क्र. 01239 विशेष उत्सव ट्रेन 30 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत दर शनिवारी नागपूर येथून दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी 2.30 वाजता करमळी येथे पोहोचेल. 01240 विशेष उत्सव गाडी 31ऑक्टोंबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत दर रविवारी करमळी येथून रात्री 8.40 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 8.10 वाजता नागपूर येथे पोहोचेल.
ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकावर थांबेल. या गाडीला 1 द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 11 शयनयान, 6 द्वितीय आसन श्रेणी डबे असतील.
मुंबई- नागपूर विशेष अतिजलद साप्ताहिक - गाडी 01247 विशेष अतिजलद गाडी 29 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दर शुक्रवारी रात्री 10.55 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसर्या दिवशी दुपारी 1.10 वाजता पोहोचेल.
01248 विशेष अतिजलद गाडी 30 नोव्हेंबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान दर शनिवारी नागपूर येथून सायंकाळी 5.40 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 8.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
कल्याण, इगतपुरी (फक्त 01248 साठी), नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा. या गाडीला 1 प्रथम वातानुकूलीत, 2 द्वितीय वातानुकूलित, 5 तृतीय वातानुकूलित, 5 शयनयान, 6 द्वितीय आसन श्रेणी.
पुणे-भगत की कोठी साप्ताहिक विशेष- गाडी क्र. 01249 विशेष दि. 22 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून रात्री 8.10 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सायंकाळी 7 .55 वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल. गाडी क्र.01250 साप्ताहिक विशेष 23 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत भगत की कोठी येथून 10.20 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सायंकाळी 7.05 वाजता पुणे येथे पोहोचेल.
ही गाडी लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, महेसाणा, पालनपूर, भिल्डी, धानेरा, राणीवाडा, मारवाड भीनमल, मोडरान, जालोर, मोकलसर, समाधारी आणि लुनी. या गाडीला 1 द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 11 शयनयान, 6 द्वितीय आसन श्रेणी डबे असतील.
या गाड्यांमधून कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमधून प्रवास करता येणार आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
Post a Comment