जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार रक्षा खडसेही रिंगणात


 

जळगाव। जिल्हा बँक निवडणुकीसाठी (District Bank Election) काँग्रेस (Congress) पाठोपाठ राष्ट्रवादीने (NCP) देखील भाजपसोबत ( BJP) लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भाजपने संपुर्ण 21 जागांवर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोमवारी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह खा. रक्षा खडसे (MP Raksha Khadse) व उन्मेश पाटील व सर्व आमदार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती माजी मंत्री गिरीश महाजन ( MLA Girish Mahajan) यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना दिली.

जिल्हा बँक निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व पक्षीय पॅनलची मोट बांधली होती. मात्र काँग्रेसने भाजपसोबत लढण्यास नकार दिल्यानंतर शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय पॅनलच्या बैठकीत राष्ट्रवादीने देखील वरिष्ठ नेत्यांकडून भाजपसोबत लढ्यास नकार दिल्याचे सांगितले.

त्यामुळे आता सर्वपक्षीय पॅनलची आशा आता धुसर झाली असल्याने सर्व पक्षांकडून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यात आतापर्यंत 105 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. भाजपने निवडणुकीसाठी आता स्वबळाचा नारा दिला असून सर्व आमदार खासदार दि. 18 रोजी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची भुमिका माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना घेतली होती.

त्यानुसार सोमवारी भाजपकडून माजी मंत्री गिरीश महाजन, खा. रक्षा खडसे, खा.उन्मेश पाटील, आ. राजूमामा भोळे, आ. संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह उमेदवार आपले अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील रंगत येणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

पक्षाच्या आदेशानुसार भरणार उमेदवारी अर्ज- खा. खडसे

आधी सर्व पक्षीय पॅनलमधून निवडणुकीची तयारी केली होती. मात्र ऐनवेळी सर्वपक्षीय पॅनलची आशा धुसर झाली आहे. जिल्हा बँक ही शेतकर्‍यांची बँक असून बँकेची जबाबदारी देखील आमची आहे. त्यामुळे पक्षाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही सर्व आमदार खासदार पदाधिकारी उद्या अर्ज दाखल करणार असल्याची माहिती खा. रक्षा खडसे यांनी दिली. त्यांनी अद्याप कुठल्या मतदार संघातून त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे हे त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

खडसेंच्या कुटुंबातील तिसरी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेत माजी मंत्री एकनाथराव खडसे संचालक आहेत. गेल्या पंचवार्षीक निवडणुकीत त्यांच्या कन्या अ‍ॅड. रोहीणी खडसे-खेवलकर या संचालक म्हणून निवडणून आल्या आणि चेअरमनही झाल्या. आता खडसेंच्या कुटुंबातील तिसरी व्यक्ती खा. रक्षा खडसे या देखील यावर्षी उमेदवारी अर्ज दाखल करुन जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post