अमेरिकनं काबूल विमानतळावरील हल्ला परतवला; ५ रॉकेट्स जिथल्या तिथे निकामी!


दिल्ली | Delhi

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा मिळवल्यानंतर आता तालिबान (Taliban) आणि अमेरिकेमध्ये (America) मोठा संघर्ष पहायला मिळत आहे. सध्या काबूल विमानतळाजवळ (Kabul Airport) सतत बॉम्बस्फोट घडवून आणले जात आहेत.

दरम्यान काबूल विमानतळाच्या दिशेने सोडण्यात आलेली पाच विध्वंसक रॉकेट (five rockets fired at Kabul's international airport) अमेरिकेने निकामी केली. हल्ल्याच्या दृष्टीने ही पाच रॉकेट काबूल विमानतळाच्या दिशेने सोडण्यात आली होती. मात्र अमेरिकेच्या डिफेन्स मिसाईल सिस्टिमने (america missile defence system) आधीच धोका ओळखून, या रॉकेटचा हल्ला होण्यापूर्वीच ती निकामी केली. अमेरिकेने हा हल्ला परतवल्याने मोठा अनर्थ टळला.

तथापि, हे सर्व रॉकेट हल्ले निष्फळ झाले आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, सुरुवातीच्या अहवालांच्या आधारे दिलेले हे विधान आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सोमवारी सकाळी हे रॉकेट हल्ले करण्यात आले होते.

रविवारी दुपारी देखील काबूल विमानतळाच्या वायव्य भागात रॉकेट हल्ला झाला. या हल्ल्यात तीन मुलं मारली गेल्याचं अफगाणी अधिकाऱ्याने सांगितलं. अफगाणिस्तानातून ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण सैन्य माघारी घेण्याच्या घोषणेनुसार अमेरिकेने आता त्याचा अखेरचा टप्पा सुरू केला आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्तास्थापनेसाठी तालिबानी नेत्यांच्या हालचालींनीही वेग घेतला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post