आजपासून होणार 'हे' बदल; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?, वाचा

 

मुंबई | आजपासून काही महत्त्वाचे बदल होणार आहेत ज्यांना तुमच्यावर मोठा परिणाम होईल. तुमच्या खिशावर याचा प्रत्यक्ष परिणाम होणार आहे. ईपीएफ खात्यापासून (EPF Account) ते बॅंकेतील चेक क्लियरिंगपर्यतच्या (cheque payment) नियमांमध्ये, बॅंकेच्या व्याजदरात, कार ड्रायव्हिंग आणि गुगलच्या (Google) सेवांमध्ये बदल होऊ घातले आहेत. हे बदल कोणकोणते आहेत आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेऊया.

तुमचं आधार कार्ड ईपीएफ खात्याशी लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employees Provident Fund EPF) सदस्यांना त्यांच्या UAN क्रमांकाशी आधार कार्ड (Aadhar Card) लिंक करणं अनिवार्य आहे. दरम्यान आधार कार्ड आणि पीएफ खातं लिंक करण्याची तारीख (Deadline to link Aadhar Card with epf Account) आज आहे. तुमचा आधार क्रमांक यूएएनशी (UAN) लिंक नसेल तर सब्सक्रायबर्सच्या खात्यात एम्प्लॉयरचे योगदान थांबवले जाऊ शकते.

तुम्ही देखील पैसे पाठवण्यासाठी चेकचा वापर करता का? तर सप्टेंबरपासून ५०हजार रुपयांपेक्षा जास्तचा चेक जारी करण्यासाठी तुम्हाला काही जास्त नियमांचं पालन करावं लागणार आहे. बहुतांश बँकांनी पॉझिटिव्ह पे सिस्टिम (PPS) लागू करण्यास सुरुवात केली आहे. अधिकतर बँकांमध्ये आजपासून पॉझिटिव्ह पे सिस्टिम (positive pay system) लागू होणार आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाने, आजपासून (१ सप्टेंबर) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून सुरक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एएसएफ फी (ASF fee) म्हणून देशांतर्गत प्रवाशांकडून आता १५० ऐवजी १६० रुपये आकारले जातील. तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून ४.८५ डॉलरच्याऐवजी ५.२ डॉलर आकरले जातील.

तर GSTR-1 फाइलिंग गाइडलाइन्स हा नियम गुड्स अॅन्ड सर्विस टॅक्स नेटवर्क संबंधित आहे. जीएसटीएनने असे म्हटले आहे की, सप्टेंबर महिना सुरु होताच GSTR-1 च्या फाइलिंगसाठी सेंट्र्ल जीएसटी नियमाच्या अंतर्गत नियम ५९(६) लागू केला जाणार आहे. या नियमानुसार जीएसटी मध्ये रजिस्टर्स असेला कोणाताही व्यक्ती ज्याने फॉर्म GSTR-3B भरलेला नाही तर त्याला GSTR-1 फॉर्म भरता येणार नाही आहे. या नियमाचा थेट परिणाम हा ज्यांनी GSTR-3B अंतर्गत रिटर्न भरलेला नाही त्यांच्यावर होणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) व्याजदरात आज पासूनबदल होणार आहे. पंजाब नॅशनल बँक बचत खात्यामध्ये जमा रकमेवर कपात करणार आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून ही माहिती देण्यात आली आहे. बँकेचे नवीन व्याजदर २.९० टक्के असणार आहेत, सध्या बँक बचत खात्यावरील रकमेवर ३ टक्के दराने व्याज देते. नवीन व्याजदर सध्याच्या आणि नव्या ग्राहकांना (Old and New Customers of PNB) लागू होतील.

एका महत्त्वपूर्ण आदेशात मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) असा निर्णय दिला आहे की १ सप्टेंबरपासून जो कुणी नवीन वाहन विकेल तेव्हा त्यावर बंपर टू बंपर इन्शुरन्स अनिवार्य असेल. हा इन्शुरन्स पाच वर्षांच्या कालावधीसाठी ड्रायव्हर, पॅसेंजर आणि गाडीच्या मालकाला कव्हर करणाऱ्या इन्शुरन्स व्यतिरिक्त असेल. बंपर टू बंपर इन्शुरन्समध्ये (Bumper to bumper insurance) गाडीच्या त्या भागासाठी देखील कव्हर मिळेल ज्यावर साधारणपणे इन्शुरन्स कंपन्या कव्हर देत नाहीत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post