शिवसेनेला धक्का! ‘या’ मोठ्या नेत्याची आमदारकी धोक्यात


 

मुंबई | मुंबईच्या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यामिनी यशवंत जाधव या सध्या चर्चेत आहेत. आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी आता निवडणूक आयोगाकडे केली आहे.

यामिनी जाधव यांनी 2019 च्या निवडणुकीवेळी आपल्या संपत्तीची माहिती लपवल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. आयकर विभागाने त्यांच्या प्रतिज्ञापत्राची पडताळणी केली असता हे उघड झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार यामिनी जाधव यांच्या संपत्तीत अनियमितता आढळून आल्याचं दिसलं आहे. जाधव यांनी 2019 साली निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 7.5 कोटी एवढी मालमत्ता असल्याचं नमुद केल होतं. यामध्ये त्यांची आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांच्या संपत्तीचा समावेश आहे.

संपत्तीचं विवरण करताना जाधव यांनी त्यांच्याकडे 2.74 कोटींची जंगम मालमत्ता असल्याचं सांगितलं होतं. यशवंत जाधव यांच्याकडे 4.59 कोटी रूपयांची संपत्ती आहे. तर 1.72 कोटींची जंगम मालमत्ता आहे, असं त्या प्रतिज्ञापत्रात नमुद केलं आहे. पण ही माहिती खोटी आहे. यामध्ये फरक जाणवतोय, असंही आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे. या माहितीच्या आधारे यामिनी यशवंत जाधव यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी विनंती आयकर विभागाने निवडणूक आयोगाला केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post