“भाजपने देशात हत्याकांड घडवलं, नरेंद्र मोदींनी देशाची जाहीर माफी मागावी”



 मुंबई | कोरोना लाटेने भारतात थैमान घातलं होतं. कोरोनाच्या दोन्ही लाटेत भारतात अनेक लोकांचा मृत्यू झाला, जानेवारीपासून भारतात लसीकरण सुरू झालं होतं. त्यानंतर आतापर्यंत 54 कोटी नागरिकांचं लसीकरण झालं आहे. याच काळात भारताने काही देशांना लस दिल्या होत्या. त्यावरून राजकारण देखील तापलं होतं. त्यानंतर आता या मुद्द्यावरून काँग्रेसने पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

कोरोना काळात अनेकांनी जीव गमावले आहेत. लोकांच्या नोकऱ्या गेल्या. लोकं आर्थिकदृष्या संकटात सापडली. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. या काळात देशात जे काही झालं आहे, ते जालियनवाला बाग हत्याकांडप्रमाणे होतं. यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे. ही मोदी सरकारची चूक आहे, असा घणाघात देखील पटोले यांनी केलाय.

भारतात लसीकरण वाढवण्यासाठी जी मदत केंद्र सरकारने करायला पाहिजे होती, ती मदत केंद्राने केली नाही. उलट त्यांनी पाकिस्तानात आणि इतर देशात लसी पाठवल्या. त्यामुळे आपल्या देशात हे हत्याकांड घडवण्याचं पाप हे मोदी सरकारनं केलंय, अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये धर्माच्या आधारावर राजकारण होतंय. त्यामुळे त्याठिकाणी अशी परिस्थिती आली आहे. जिथं धर्माच्या आधारावर राजकारण होतं तिथं असंच होतं. पण हिंदूस्तानात असं होणार नाही. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांचा चेहरा लोकांच्या समोर आलाय, असं म्हणत पटोलेंनी भाजपला चिमटा काढला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post