चार दिवसांपासून खासदार उदयनराजे रुग्णालयात, पुण्यात उपचार सुरु! पुणे |
 भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले गेल्या चार दिवसांपासून पुण्यात उपचार घेत असल्याची माहिती समजत आहे. उदयनराजे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. पुण्यामधील रूबी हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

दिल्लीवरून परतल्यानंतर उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजत आहे. त्यानंतर त्यांना पुण्यामधील रूबी हॉस्पीटलला उपचारासाठी आणण्यात आलं होतं. उदयनराजेंची प्रकृती आता व्यवस्थित असल्याची समजतंय. येत्या दोन दिवसात त्यांना डीस्चार्ज मिळाणार असल्याचं निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं आहे.

उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे उदयनराजे अधिवेशन सोडून परतले होते.

दरम्यान, कोरोना काळात दुकाने सुरू करावीत अशी मागणी करण्यासाठी उदयनराजेंनी लोकांची विनाकारण अडवणूक करू नका यासाठी भीकमांगो आंदोलन केलं होतं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post