मानेचा आकारही सांगतो माणसाचा स्वभाव; हे वाचल्यावर तुम्हाला समजेल

माय  वेब टीम

हेल्थ डेस्क - व्यक्तींचा स्वभाव ओळखण्यासाठी त्याचे हावभाव, चेहरा, डोळे याबरोबर त्या व्यक्तीच्या शरीराचा आकार याचाही विचार केला जातो. प्राचीन काळापासून (Ancient Times) ही पद्धत अवलंबली जाते. व्यक्तीच्या शरीराची ठेवण असते त्यावरून त्याचा अभ्यास करता येतो. शरीरावरील तिळ, भूवयांचा आकार यांच्याबरोबर मानेच्या आकारावरूनही व्यक्तीबद्दल माहिती घेता येते. एवढच नाही तर,ती व्यक्ती भाग्यशाला आहे की कम नशिबी हेही ठरवता येतं.

सरळ मान

समुद्रशास्त्रानुसार(samudrik shastra) सरळ मान असलेल्या लोकांना स्वाभिमानी (Self-respecting) मानलं जातं. अशी माणसं स्वत:ची ओळख बनवतात. त्यांना कोणाकडूनही मदत घेणं आवडत नाही. ते त्यांच्या नियमांनुसार जीवन जगतात. हे चांगले मित्र असले तरी,आपल्या मित्रांना मदत करता.

आदर्श मान

ज्या लोकांच्या मानेची लांबी आणि रुंदी समान आहे. ते आदर्शवादी असतात. असे लोक समाजाच्या कल्याणासाठी नेहमी पुढे असता. कठोर परिश्रमापासून असे लोक कधीही तोंड फिरवत नाहीत. लोकांबरोबर असे लोक समंजसपणे वागतात पण, इतरांची मदत घ्यायला त्यांना अजिबात आवडत नाही.

तिरकी मान

ज्यांची मान तिरकी असते ते नेहमी विचार मग्न असतात. बऱ्याचवळा  त्यांना विचार व्यक्त करतान त्रास होतो. यामुळेच ते लोकांचा विश्वास पटकन जिंकत नाहीत. त्यांना फिरवाफिरवी करायला आवडते. पण, प्रयत्नांनी त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल येऊ शकतात.

थोडी छोटी मान

ज्यांची मान सामान्य आकारापेक्षा लहान आहे. असे लोक खूप सरळ असतात. ते अबोल असतात आणि मेहनती असतात. ते कामावर लक्ष केंद्रित करतात आणि कोणावरही सहज विश्वास ठेवतात. ते प्रेमळ उत्साही आणि विनम्र स्वभावाचे असतात. लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात पण, ते धोकाही देऊ शकतात.

बारिक मान

ज्यांची पातळ मान आहे अशा लोकांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते आणि ते आळशीपणा असतात. त्यामुळे त्यांना लवकर रोग होतात. ते कमी महत्वाकांक्षी आणि मीतभाषी असतात.पण, त्यांनी योगा, व्यायाम केल्यास रोग प्रतिकारशक्तीला बळकट होऊ शकते.

मान वाकवून चालणारे

समुद्रशास्त्रानुसार, मान वाकवून फिरणारी व्यक्ती खूप भाग्यवान मानली जाते. नशीब अशा लोकांना पूर्णपणे अनुकूल असतं. त्यामुळे त्यांना कोणत्याच कामात अडचणी येत नाहीत. प्रत्येक काम उत्साहाने करतात.

आवश्यकतापेक्षा जास्त मोठी

समुद्रशास्त्रानुसार, ज्यांची मान आवश्यकतेपेक्षा मोठी आहे. ती माणसं धैर्याने सत्याच्या मार्गावर चालतात. ते परिश्रमांच्या जोरावर प्रत्येक भौतिक वस्तूचा आनंद मिळवतात. प्रत्येक गोष्ट गांभीर्याने आणि उत्साहाने करतात. हे लोक विश्वासू  असतात. अशी मान असलेले लोक बुद्धिमान आणि सामर्थ्यवान असतात.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post