केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; केंद्राने महागाई भत्ता 28 टक्के केला; तिजोरीवर 34 हजार कोटींचा भार


माय वेब टीम 

नवी दिल्ली - केंद्रीय कर्मचारी अाणि निवृत्ती वेतनधारकांसाठी केंद्र सरकारने खुशखबर दिली अाहे. त्यांची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा आता संपली असून केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात (डीए) तसेच महागाई (डीआर) मदतीत १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. थकीत तीन हप्तेही दिले जाणार आहेत. महागाई भत्त्याचा दर वाढवून तो २८ टक्के करण्यात आला आहे.

ही वाढ मूळ वेतन किंवा पेन्शनच्या १७ टक्के दराने ११ टक्के आहे. या निर्णयाचा सुमारे ४८.३४ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५.२६ लाख निवृत्ती वेतनधारकांना होईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली.

तिजोरीवर ३४ हजार कोटींचा भार
त्यांनी म्हटले की, डीए आणि डीआर वाढल्याने सरकारी तिजोरीवर ३४,४०१ कोटी रुपयांचा दरवर्षी भार पडणार आहे. कोरोना महामारी लक्षात घेता डीए आणि डीआरचे तीन अतिरिक्त हप्तेही थांबवले होते. हे हप्ते मागील वर्षी १ जानेवारी, १ जुलै आणि या वर्षी १ जानेवारीला देय होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post