माय वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्याच्या (District) काही भागात विशेषत: ग्रामीण भागात (rural areas) अद्यापही करोना बाधित रुग्ण (Corona Positive Patient) आढळून येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या (RTPCR Testing) कराव्यात. ग्रामसुरक्षा दल आणि हिवरे पॅटर्नप्रमाणे (Hivare Patterne) गावात स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी आता अधिक सक्रीय भूमिका बजावण्याची गरज आहे. त्यासाठी तालुकास्तरीय अधिकार्यांनी अशा गावांना थेट भेटी देऊन पाहणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांनी शुक्रवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून करोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन (Guidance on Corona Measures) केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,(CEO Rajendra Kshirsagar) नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, रोहिणी नर्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे, डॉ. बांगर, डॉ. भागवत दहिफळे हे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग, तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
सध्या जरी रुग्णसंख्येत काहीशी घट दिसून येत असली तरी संसर्गाचा धोका (Risk of infection) अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, विशेषता सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे (Social Distance) आणि वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर (Sanitizer Use) करणे आवश्यक आहे. अद्याप ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत. ही बाब गांभीर्यांने घेणे आवश्यक आहे. गावात बाहेरगावाहून आलेल्या आणि आजाराची लक्षणे असणार्या व्यक्तींची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने गावात कार्यरत विविध पथकांनी आता सक्रीय भूमिका बजावणे गरजेचे आहे.
Post a Comment