५ मजली इमारतीचा एक भाग कोसळला, ५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती


 

माय वेब टीम 

मुंबई -मुंबईत आणखी एक भीषण अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, एका पाच मजली इमारतीचा भाग अचानक कोसळला आहे. या अपघातात आतापर्यंत 34 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून तब्बल ५ जण ढिगाराखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही पाच मजली इमारत दक्षिण मुंबईतील फोर्ट भागात होती.


या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस दाखल झाले असून सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता ही घटना घडली. इमारतीमध्ये दुरुस्तीचं काम सुरू होतं. याचवेळी हा अपघात झाला आहे.

ही इमारत काही वर्ष जुनी आहे आणि त्याच्या अंतर्गत दुरुस्तीचे काम चालू होते. ही इमारत म्हाडाची असून ज्या भागाची दुरुस्ती केली जात होती तोच भाग पडला आहे. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

इमारतीच्या तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला आहे. बचावलेल्या ३४ जणांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या घटनेमध्ये कोणीही गंभीर जखमी झालं नसून अधिक बचावकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post