गुगल सर्च करून रचला हत्येचा कट! महाराष्ट्रातून घरी परतलेल्या पतीला प्रियकराच्या मदतीने संपवलं


माय वेब टीम  

उत्तर प्रदेश - लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील स्वतःच्या घरी परतलेल्या एका व्यक्तीची त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची एक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील खेडीपूर भागात ही घटना घडला आहे. प्रकरणाचा तपास करताना पोलीसही चक्रावून गेले. महिलेनं पतीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चक्क गुगल सर्च करून कट रचल्याचं समोर आलं आहे. 

उत्तर प्रदेशातील खेडीपूरा भागात १८ जून रोजी ही घटना घडली. तबस्सूम असं आरोपी महिलेचं नाव असून, आमिर असं हत्या करण्यात आलेल्या पतीचं नाव आहे. तर तबस्सूमचे इरफान नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. १८ जून रोजी तबस्सूमने आमिरचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना माहिती दिली. त्याचा मृत्यू कसा झाला याविषयी आपल्या माहिती नसल्याचंही ती म्हणाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आणि तपास सुरू केला. तपासादरम्यान, तबस्सूमनेच प्रियकर इरफानला सोबत घेऊन पती आमिरची हत्या केल्याचं उघड झालं. 

आमिर हा महाराष्ट्रात कामाला होता. याच काळात त्यांच्यासमोर आर्थिक चणचण निर्माण झाली. याच काळात विश्वासू असलेल्या इरफान आणि तबस्सूम यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, लाकडाउन लागल्याने आमिर महाराष्ट्रातून घरी परतला. आमिर घरी परतल्याने तबस्सूम आणि इरफान यांच्या भेटीत मोठा अडथळा निर्माण झाला. भेटता येत नसल्याने तबस्सूम आणि इरफानने आमिरची हत्या करायचं ठरवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आमिरला दम्याचा त्रास आहे आणि त्याला दररोज औषधी घ्यावी लागते. 

तबस्सूमने आमिर दम्याच्या नेहमीच्या गोळ्या दिल्याच नाही. त्याऐवजी तिने दुसऱ्याचं गोळ्या दिल्या. ज्यामुळे आमिर बेशुद्ध झाला. त्यानंतर तबस्सूम आणि इरफानने रात्री आमिरची हत्या केली. दोघांनी आमिरचे हातपाय ओढणीने बांधले आणि त्यानंतर इरफानने त्यांच्या डोक्यात हातोड्यानं हल्ला केला. आमिरचा मृत्यू होईपर्यंत इरफान हातोड्याने मारत होता, असं पोलिसांनी सांगितलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post