आरोग्य:दीर्घ श्वसनामुळे 48 तासांत शरीराला होतात हे पाच फायदे ; जाणून घ्या

 


माय वेब टीम 

हेल्थ डेस्क - दरराेज काही वेळ दीर्घ श्वसन केल्याने तुमच्या आरोग्यासह जीवनशैलीत खूप सुधारणा होते. तुम्ही चिंतित वा त्रस्त असता तेव्हा तुमच्या हृदयाची धडधड सातत्याने वाढत जाते. रक्तप्रवाह हृदय व मेंदूकडे वाढू लागतो. हे टाळण्यासाठी दीर्घ श्वसन करण्याचा सराव दररोज केला पाहिजे, मग भलेही तणाव असो की नसो. यामुळे २४ ते ४९ तासांतच मन व शरीराला आराम मिळतो आणि झोपही चांगली येते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये आणखी सुधारणा होते.

शरीरातील विषारी घटक घटतात
सावकाश, सखोल व दीर्घ श्वास घेतल्याने शरीर डिटॉक्सिफाय होण्यासह मन शांत होण्यास मदत होते. झोप चांगली येते. निद्रानाशाचा त्रास असेल तर झोपण्यापूर्वी दीर्घ श्वसन करा. श्वासातून बाहेर येणारा कार्बन डायऑक्साइड नैसर्गिक आहे. छोट्या श्वासांमुळे फुप्फुसे कमी प्रतिक्रिया करतात. इतर अवयवांना हा कचरा बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.

प्रतिकारशक्ती मजबूत होते
दीर्घ श्वसनाने ताजा आॅक्सिजन मिळतो आणि विषारी पदार्थ व कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. रक्त ऑक्सिजनेटेड झाल्यामुळे शरीराची संरक्षण यंत्रणा मजबूत होते. शरीराचे महत्त्वाचे अवयव नीट काम करतात. क्लीनर, टॉक्सिनमुक्त आणि निरोगी रक्तपुरवठ्याने संसर्ग पसरवणारे जंतू मुळापासून नष्ट होतात.

वेदनांची जाणीव कमी होते
दीर्घ श्वसनाने शरीरात एंडाॅर्फिन तयार होते. हे गुड हार्मोन आहे आणि शरीराद्वारे तयार केलेले नैसर्गिक वेदनाशामक आहे.

तणाव कमी होतो
दीर्घ श्वसनाने चिंताजनक विचार आणि घबराटीपासून मुक्तता होते. हृदयाची गती धीमी होते. त्यामुळे शरीर अधिक ऑक्सिजन घेऊ शकते. हार्मोन संतुलित होतात. काॅर्टिसोलची पातळी कमी होते. काॅर्टिसोल हे स्ट्रेस हार्मोन आहे. त्याची पातळी जास्त काळ वाढलेली असल्यास शरीराचे जास्त नुकसान होऊ शकते.

रक्तप्रवाह चांगला होतो
डायफ्राम वर आणि खाली होत असल्याने रक्तप्रवाहाची गती वाढते. त्यामुळे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post