चार अभिनेत्रींसह 22 अटकेत; हिना पांचाळसह हिंदी, तेलगू चित्रपटांतील अभिनेत्रींचा समावेश





माय वेब टीम 

 मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इगतपुरीमधील एका रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर नाशिक ग्रामीण पाेलिसांनी शनिवारी रात्री २ वाजता छापा टाकला. काेराेना निर्बंधांचे काेणतेही नियम न पाळता अायाेजित या पार्टीत हिंदी तसेच तेलगू चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या चार महिला आणि तरुण सहभागी होते. त्यात बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हिना पांचाळ व अझार फारनूद या विदेशी महिलेसह दोन कोरिअाेग्राफरचाही समावेश आहे. नायजेरियन ड्रग माफियाच्या सहकार्याने मुंबईमधील एका बड्या बुकीच्या वाढदिवसानिमित्त ही जंगी पार्टी देण्यात आली होती, हुक्का, कोकेन, हेरॉइनचा त्यात मुक्तहस्ते वापर सुरू हाेता.

याप्रकरणी पोलिसांनी १२ महिला आणि १० पुरुष अशा २२ जणांना अटक केली आहे. पाठाेपाठ मुंबईतून पाेलिसांनी नायजेरियन ड्रग माफियालादेखील अटक केली. त्यांची चाैकशी रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री छापा टाकला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथील पीयूष नामक व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त इगतपुरीच्या स्काय ताज व्हिला येथे मुंबई व पुण्यातील १० पुरुष व १२ महिलांची रेव्ह पार्टी अायाेजित करण्यात अाली हाेती. २७ जूनला रात्री बारा वाजता वाढदिवसाचा केक कापण्यात अाला.

या वेळी गाणी-बजावणी सुरू हाेती. सर्वजण मद्याच्या नशेत हाेते. काहींकडे हुक्का, चरस, गांजा, काेकेन अाणि हेराॅइन अाढळून अाले. छाप्यात कॅमेरा, ट्रायपॉड, मादक पदार्थ जप्त करण्यात अाले. याची पाळेमुळे विदेशापर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले. अप्पर पाेलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक अर्जुन भोसले, निरीक्षक समाधान नागरे, सहायक निरीक्षक दीपक पाटील, संदीप शिंदे, लोहरे, वैभव वाणी, मुकेश महिरे, राज चौधरी, सचिन पिंगळे, संदीप हंडगे, नवनाथ गुरुळे याप्रकरणी तपास करत आहेत.

लैला खानचे प्रकरण गाजलेले, कारवाईनंतरही पार्ट्या, तस्करी सुरूच
राज्याचे प्रति-काश्मीर समजले जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात नेहमीच देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथील अनेक हॉटेल- रिसाॅर्टसाठी ऑनलाइन बुकिंग होते. या जागा नेहमी उच्चभ्रूंच्या पार्ट्यांसाठी प्रसिद्ध अाहेत. यापूर्वीही पाकिस्तानी अभिनेत्री लैला खानचे प्रकरण गाजले हाेते. तीन वर्षांपूर्वी विवस्त्र अवस्थेत पार्ट्या रंगल्या होत्या. त्या वेळीही पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतरही हे प्रकार व मादक पदार्थाची तस्करी थांबलेली नाही. स्थानिक पोलिस व प्रशासनाला काेणीही जुमानत नाही. त्यावरून या सर्व प्रकारांना उच्चपदस्थांचे अाशीर्वाद असल्याचीही चर्चा अाहे.

ड्रग्ज देणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला मुंबईतून अटक
पार्टीसाठी ड्रग्ज पुरवणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीला मुंबई येथून अटक करण्यात आली. अाणखी धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांकडून रविवारी रात्री उशिरापर्यंत संशयित आरोपींची चौकशी सुरू होती.

मुख्य आयोजक आणि रिसॉर्ट मालक रडारवर
या पार्टीचे आयोजक आणि रिसॉर्ट मालकावर कारवाई केली जाणार असून रिसॉर्ट सील करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक सचिन पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना दिली.

विदेशी महिला अझार फारनूदसह २२ जणांचा सहभाग स्पष्ट
या पार्टीत बॉलीवूडची ‘बिग बॉस मराठी’ रिअॅलिटी शाेमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री हिना पांचाळ हिच्यासह विदेशी महिला अझार फारनूद हिच्यासह पीयूष शेट्टी, आरव, विशाल मेहता, रोहित अरोरा, अकीब, वरुण बाफना, करिश्मा, चांदणी भटिजा, श्रुती शेट्टी, रुचिरा नार्वेकर, शनैया कौर, आषिता, शीना, प्रीती चौधरी, कौशिकी असे एकूण २२ जण हाेते. अाणखी चार जणांची नावे समजली नाहीत. काही जणांनी पाेलिस येताच पळ काढल्याचे सांगण्यात अाले

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post