त्वचा राहील तरूण व सुंदर, दररोज खा एक वाटी द्राक्षे

 


माय अहमदनगर वेब टीम

हेेल्थ डोेस्क - ऑक्सिडेशन ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरीही या प्रक्रियेमुळे आपल्या त्वचेचं सतत नुकसान होत असते. या प्रक्रियेवर आपण नियंत्रण मिळवू शकत नाही, पण यामुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम नक्कीच कमी करू शकतो. ऑक्सिडेशनमुळे (skin oxidation) आपल्या त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. सोबतच फ्री रॅडिकल्समुळेही त्वचेचं भरपूर नुकसान होते. 

अशा परिस्थितीत जर तुम्ही त्वचेची योग्य देखभाल न केल्यास आणि त्वचेला पोषण तत्त्वांचा पुरवठा न झाल्यास भविष्यात गंभीर परिणामांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, मुरुम, त्वचा सैल पडणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. परिणामी लहान वयातही चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतील. या समस्येवर उपाय म्हणून आपण आपल्या डाएटमध्ये द्राक्षांचा समावेश करू शकता. 

​द्राक्षांच्या सेवनामुळे खुलते सौंदर्

त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी द्राक्षांचे सेवन करणं लाभदायक असते. कारण यातील पोषक घटकांमुळे शरीरावर ऑक्सिडेशनचे दुष्परिणाम कमी होतात आणि त्वचेचे झालेले नुकसान देखील भरून निघते. द्राक्षांमध्ये नैसर्गिक स्वरुपात अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असते.

याच कारणामुळे जी लोक नियमित स्वरुपात आणि मर्यादित प्रमाणात द्राक्षांचे सेवन करतात, त्यांची त्वचा अधिक निरोगी व आकर्षक दिसते. द्राक्षांमधील रेव्हेराट्रोल (Resveratrol) हे घटक ऑक्सिडेटिव स्ट्रेस नियंत्रित करण्याचे कार्य करतात.

​मुरुमांची समस्या उद्भवल्यास…

मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी नियमित मर्यादित स्वरुपात द्राक्षांचे सेवन करणं आवश्यक आहे. नियमित एक वाटी किंवा मूठभर द्राक्षांचे सेवन करावे. पण यापूर्वी आपल्या ओळखीच्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

द्राक्षांच्या सेवनामुळे चेहऱ्यावरील मुरुम दूर होण्यास मदत मिळते. कारण यातील अँटी- ऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेसाठी थेरपीच्या स्वरुपात कार्य करतात. यामुळे त्वचेची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत मिळते. यामुळे शरीराच्या बाहेरील आणि आतील विषारी घटकांविरोधात लढण्यास त्वचेलाही मदत मिळेल.

​हानिकारक सूर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण होतं

द्राक्षांमध्ये पॉलिफेनोलचे घटक असतात. हे एक अँटी-ऑक्सिडंट असून जे प्रामुख्याने वनस्पतींद्वारे मिळते. द्राक्षांमध्ये या घटकाची मात्रा चांगली असते. सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचे झालेले नुकसान कमी करण्याचे कार्य पॉलिफेनोल्स करतात.

उदाहरणार्थ सनबर्न, सनटॅन यासह अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे शरीरावर होणारे वाईट परिणाम कमी करण्याचे कार्य पॉलिफेनोल करतात.

आपल्या त्वचेसह आरोग्यावरही सूर्यप्रकाशाचे वाईट परिणाम होतात.

​सुंदर केसांसाठी द्राक्षाचे फायदे

द्राक्षांमध्ये ग्लुकोज, प्रोटीन, लिपिड, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, सोडिअम, पोटॅशियम, झिंक आणि कॉपर यासारख्या पोषण तत्त्वांचा समावेश आहे. हे सर्व घटक आपल्या केसांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठीही आवश्यक आहेत.

प्रोटीन, लोह, कॅल्शिअम आणि फॉस्फरस यासारख्या तत्त्वांमुळे केस सुंदर आणि घनदाट होण्यास मदत मिळते.

आपल्या डाएटमध्ये या गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे.

​या गोष्टी ठेवा लक्षात

नियमित आणि मर्यादित स्वरुपात द्राक्षांचे सेवन केलं तर आरोग्याला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळेल. द्राक्षांसह अन्य हंगामी फळ-भाज्यांचेही सेवन करावे. लोहयुक्त खाद्यपदार्थांचा डाएटमध्ये जास्त प्रमाणात समावेश करावा.

जर तुम्ही एखाद्या गंभीर आजाराने पीडित असाल; उदाहरणार्थ मधुमेह, दमा, अ‍ॅलर्जी इत्यादी समस्यांचा सामना करत आहात तर द्राक्षांचे सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण तुमच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार डॉक्टर तुम्हाला द्राक्षांच्या सेवनाचे योग्य प्रमाण ठरवून देतील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post