म्हणून यांनी गुंतवणुकीत तज्ज्ञांचा सल्ला घ्या; वाचा, आजचे राशीभविष्य

 


माय अहमदनगर वेब टीम

मंगळवार, ०१ डिसेंबर २०२०. चंद्र दिवसाच्या उत्तरार्धात वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा राशीबदल सावधगिरी बाळगण्याचा ठरू शकेल. तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकतील? जाणून घेऊया... 

आजचे मराठी पंचांग : मंगळवार, ०१ डिसेंबर २०२० 

मेष : सरकारी कामे मार्गी लागतील. बोलताना शब्दांवर ताबा ठेवा. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. मुलांकडून समाधानकारक वार्ता मिळतीलच असे नाही. आपली प्रतिमा मलीन होणार नाही, याची काळजी घ्यावी. हितशत्रूंच्या कारवायांपासून सावध राहावे. दिवसाचा उत्तरार्ध चांगला असेल. जोडीदाराचे सहकार्य व सानिध्य लाभेल. 

वृषभ : नुसत्या विचारात न राहता कार्य हातात घ्या. नशिबाची साथ लाभेल. मानसिक समाधान आणि शांतता लाभेल. राजकीय क्षेत्रातील प्रयत्न यशस्वी ठरू शकतील. जनसंपर्कात भर पडेल. नवीन करारामुळे पद, प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. वडिलांचे शुभाशिर्वाद मिळतील. मुलांकडून दिलासादायक वार्ता समजेल. दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल असेल. 

मिथुन : नोकरी व्यवसायात अधिकाराची जागा मिळेल. गुंतवणुकीत तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील. मुलांकडून शुभवार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील. व्यापार नव्या करारातून उत्तम लाभ मिळू शकतील. मौल्यवान वस्तू जपा. विद्यार्थी वर्गाचा भविष्यातील योजनांवर भर राहील. 

कर्क : भागीदारीत विचार जुळतील. हेतू पूर्ण होत नाही तोपर्यंत आपली बाजू लावून धरा. भावंडांशी असलेले नाते दृढ होईल. कुटुंबासोबत पर्यटनाच्या योजना आखाल. आजिविका क्षेत्रात प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. मान, सन्मान, प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडाल. नवीन व्यवसायातून लाभ मिळू शकतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. 

सिंह : आपले कर्तृत्व लोकांमध्ये उठून दिसेल. सरकारी निकाल आपल्याबाजूने लागतील. कुटुंबातील सदस्यांसोबत उत्तम वेळ व्यतीत कराल. मन प्रसन्न राहील. मिळकतीचे नवे स्रोत सापडतील. बोलण्यातील माधुर्य सन्मान वाढवेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश साध्य करता येऊ शकेल. हितशत्रू पराभूत होतील. परदेशातील आप्तेष्टांकडून शुभवार्ता मिळू शकेल. 

कन्या : आपल्या बुद्धिमत्तेचा लोकांना उपयोग होईल, असे वागा. विद्यार्थ्यांना उत्तम काळ. कार्यक्षेत्रात अधिकारी वर्गाकडून प्रशंसा होईल. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता. मित्रांची मदत करण्याची संधी मिळेल. प्रयत्नांना यश मिळेल. मुलांकडून समाधानकारक सुखद वार्ता मिळेल. न्यायालयीन प्रकरणात सकारात्मकता येईल. 

तुळ : प्रतिस्पर्ध्याची ताकद ओळखा. आपल्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेऊ देऊ नका. व्यापारी वर्गाला उत्तम संधी उपलब्ध होतील. कीर्ती वृद्धिंगत होईल. आजचा दिवस सुखद व अनुकूल असेल. मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. समस्यांचे निराकरण होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य लाभेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभ मिळू शकेल. 

वृश्चिक : आपली मेहनत फळाला येईल. आपल्या कर्तृत्वावर शाबासकी मिळवाल. जोखीम पत्करून केलेली गुंतवणूक लाभदायक ठरू शकेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. रोजगार क्षेत्रातील समस्यांचे निराकरण होऊ शकेल. व्यापारी वर्गाला नव्या स्रोतातून उत्तम फायदा होऊ शकेल. धनलाभाचे योग प्रबळ होऊ शकतील. 

धनु : कौटुंबिक भांडणात वेळ पाडलीतरच लक्ष घाला. कारण नसताना वाद ओढवून घेऊ नका. भागीदारीत काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्तीसाठी अधिक मेहनत व परिश्रम घ्यावे लागतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकेल. 

मकर : आपल्या कला कौशल्याने नव्या व्यवसायात उतरा. लोकांची मदत घेण्यास लाजू नका. सामाजिक प्रतिष्ठा विस्तारेल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडाल. कनिष्ठ सहकाऱ्यांकडून आदर, सहकार्य मिळेल. विवाहेच्छुक मंडळींना सुखदवार्ता मिळू शकतील. पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. दिवसाच्या उत्तरार्धात कोणत्याही वादात पडू नये. 

कुंभ : अचानक घडणाऱ्या गोष्टींवर विचार करून पुढील निर्णय घ्या. विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. मित्राकडून फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. भावंडांशी असलेले नाते दृढ होईल. बोलताना तारतम्य बाळगावे. अचानक प्रवास घडतील. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. 

मीन : फसवणुकीपासून दूर राहा. जुन्या ओळखींना पुन्हा उजाळा द्या. कौटुंबिक वातावरण आनंदी अ

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post