चंद्राचा मिथुन प्रवेश : 'या' ६ राशींना अनुकूल दिवस; आजचे राशीभविष्यमाय अहमदनगर वेब टीम

बुधवार, ०२ नोव्हेंबर २०२०. चंद्र बुधाचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीत विराजमान असेल. मिथुन आणि वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम असेल. एकूण ग्रहमान पाहता तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकतील? जाणून घेऊया...

आजचे मराठी पंचांग : बुधवार, ०२ डिसेंबर २०२०

मेष : भविष्याच्या तरतुदीचा पूर्ण विचार करा. सगळे ठोकताळे अचूक मांडा. आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. कौटुंबिक जीवन आनंदी आणि सकारात्मक असेल. सुख, सुविधांसाठी खर्च होईल. कार्यक्षेत्रातील वातावरण अनुकूल राहील. अति गोड पदार्थ खाणे टाळावे. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींच्या मेहनतीचे चीज होईल. छोटे प्रवास संभवतात.

वृषभ : हातात असलेली संधी तूर्तास सोडू नका. आळस बाजूला झटका. आजचा दिवस अनुकूल असेल. दुपारनंतर शुभवार्ता मिळू शकेल. व्यापारी वर्गाला लाभाच्या संधी उपलब्ध होतील. मन प्रसन्न होईल. सायंकाळपर्यंत एखादा महत्त्वाचा करार पूर्णत्वास जाऊ शकेल. हितचिंतक आणि मित्रांचे योग्य सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

मिथुन : आपल्या विचारांवर पूर्ण काम करा. कष्टाचे फळ या वेळेस नक्की मिळेल. धैर्य, संयमाने परिस्थिती हाताळणे हिताचे ठरेल. पालकांचे शुभाशिर्वाद लाभतील. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढू शकेल. खर्चात वाढ होऊ शकेल. अनावश्यक खर्चांवर योग्य नियंत्रण ठेवावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे.

कर्क : घरात शुभकार्य घडतील. नोकरीत मोठी हालचाल घडेल. अति विचाराने मानसिक ताण वाढू शकेल. ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. प्रयत्न यशस्वी ठरतील. सामाजिक मान, सन्मान, प्रतिष्ठा लाभेल. अज्ञान स्रोतातून धनलाभाचे योग प्रबळ होऊ शकतील. व्यवसाय विस्तारासाठी चांगला कालावधी. घाईन कोणतेही निर्णय घेऊ नयेत.

सिंह : शांतपणे निर्णय घ्या. नशिबाची साथ लाभेल. मनोबल वाढीस लागेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस. प्रलंबित कामे मार्गी लागतील. विरोधक पराभूत होतील. दिवसाचा उत्तरार्ध हास्य-विनोद, मौज-मजेत व्यतीत होऊ शकेल. आहारावर योग्य नियंत्रण ठेवावे. जनसंपर्कात भर पडेल.

कन्या : आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी वाद विवाद टाळा. रचनात्मक कार्यात यश व प्रगती साध्य करता येऊ शकेल. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकता येतील. नवीन कार्यारंभासाठी अनुकूल कालावधी. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा लाभेल. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल.

तुळ : आपल्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी घडतील. छोटे प्रवासाचे योग येतील. राशीस्वामी शुक्रच्या शुभ स्थितीमुळे आजचा दिवस लाभदायक ठरू शकेल. मिळकतीचे नवे स्रोत उपलब्ध होतील. शिक्षणातील प्रयत्न यशस्वी ठरतील. जोडीदाराचे सहकार्य व सानिध्य लाभेल. मित्रांची मदत मोलाची ठरेल. आवडत्या वस्तूंची खरेदी कराल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये.

वृश्चिक : उत्तम लिखाण व वाचन होईल. राहिलेले कार्य पुढे नेण्याच्या तयारीत राहा. दिवसाची सुरुवात ऊर्जावान आणि उत्साहवर्धक असेल. मात्र, अति उत्साहात चूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. आर्थिक आघाडीवर उत्तम दिवस. मान, सन्मान प्राप्त होतील. प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतात. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग. केवळ कामावर लक्ष केंद्रीत ठेवावे.

धनु : समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घ्या. हितचिंतकांचा सल्ला ऐका. सुख, सुविधा वृद्धिंगत होईल. कार्यक्षेत्रात एखाद्या सहकाऱ्यामुळे समस्यांचा सामना करावा लागू शकेल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. विरोधक पराभूत होतील. हितशत्रूंच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. गृहपयोगी वस्तूंची खरेदी कराल.

मकर : मानसिकता भक्कम करून मगच मोठ्या निर्णयाकडे झुका. आवडत्या क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध होईल. दिनक्रम अतिशय व्यस्त राहू शकेल. विपणन आणि विक्री क्षेत्रातील व्यक्तींवर कामाचा ताण अधिक राहील. आर्थिक आघाडीवर दिवस अनुकूल असेल. चिंतामुक्त राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे. जोडीदाराशी योग्य ताळमेळ ठेवा. मन शांत ठेवून कार्यरत राहावे.

कुंभ : सामाजिक ठिकाणी फसवणूक टाळा. विद्यार्थ्यांना मोठ्या उत्कर्षाचा काळ. आजचा दिवस खर्चिक असू शकेल. अनावश्यक गोष्टींवर खर्च होण्याचे संकेत. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कार्यक्षेत्रात वादाचे प्रसंग उद्भवू शकतील. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. मुलांकडून शुभवार्ता समजतील.

मीन : घरातील जुने प्रश्न मार्गी लागतील. आपल्या जवळची माणसे ओळखा. आजदिवस अनुकूल असेल. छोटे प्रवास घडतील. व्यवसाय, व्यापारात चांगली प्रगती होत असल्याचे दिसून येईल. एखादा महत्त्वाचा करार पूर्णत्वास जाऊ शकेल. विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळू शकेल. पालकांचे शुभाशिर्वाद लाभतील. लांबच्या मित्राशी संपर्क होऊ शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post