'या' कारणामुळे शरद पवार पंतप्रधान होता होता राहिले



माय अहमदनगर वेब टीम

मुंबई -

'राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची संधी दोनवेळा हुकली. त्यास त्या वेळच्या काँग्रेसच्या काही नेत्यांचे राजकारण कारणीभूत होते. आपण तेव्हाही काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडीवर टीका केलेली आहे,' असे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. त्यापूर्वी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील व्हर्च्युअल रॅलीत बोलताना पटेल म्हणाले, की शरद पवार यांच्या पाठिशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. तसे झाल्यास तो दिवस आम्हांला पाहायला मिळू शकतो.

'१९९६ आणि नंतर अशी दोन वेळा शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची संधी आली होती. तसे झाले असते तर देशासाठी चांगले दिवस राहिले असते. केवळ युपीएमुळे नव्हे; तर देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास देशात परिवर्तन होऊ शकते. शरद पवार यांच्या रूपाने महाराष्ट्रातील पंतप्रधान होऊ शकतो,' अशा आशावाद प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. दरम्यान, 'तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी त्यांच्या राज्यातील सर्व खासदार उभे राहू शकतात. तसे पवारसाहेबांच्या पाठीशी राज्यातील ४८ खासदार का उभे राहू शकत नाहीत, असा प्रश्न त्यांनी व्हर्च्युअल रॅलीत उपस्थित केला. तसा महाराष्ट्र आजही साहेबांच्या पाठीशी उभा आहे; परंतु महाराष्ट्राने शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे; तर तो दिवस दूर नाही. जे स्वप्न आपण पाहात आहोत, ते पूर्ण करू या,' असे पटेल म्हणाले.

'मोदी फक्त पवारांना भेटायचे'

'मला ४० वर्षे शरद पवार यांना जवळून पाहण्याचा भाग्य लाभले. मला घडवण्यामध्ये आणि मी जो काही आहे तो पवार साहेबांमुळे आहे. तीस वर्षांत राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांच्यासोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असताना जेव्हा जेव्हा दिल्लीला यायचे. तेव्हा फक्त आणि फक्त पवार यांच्याकडे येत होते. समाजकारणात पवार साहेबांनी कधी राजकारण केले नाही,' असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post