जुगारावर रेड; 50 प्रतिष्ठित जाळ्यात
माय अहमदनगर वेब टीम

शेवगाव : शेवगाव शहरात विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या विशेष पथकानं मोठी कारवाई करीत जुगार अड्डयावरील 50 हून अधिक जणांना ताब्यात घेतलं. बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. शहरातील फिरोज इनामदार यांच्या मालकीच्या जागेत हा जुगार अड्डा सुरु होता. नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक प्रदीप दिघावकर यांच्या विशेष पथकाने रात्री हा छापा घातला. यामध्ये सुमारे 38 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यात दुचाकी वाहने, रोख रक्कम आणि जुगार खेळण्याचे साहित्य यांचा समावेश आहे. या कारवाईत अनेक प्रतिष्ठित जुगार खेळताना आढळून आल्याने या छाप्याची जिल्ह्यात चर्चा होत आहे. शेवगाव पोलिस ठाण्याच्या अखत्यारित असलेल्या अवैध उद्योगावर थेट नाशिकच्या पथकाकडून कारवाई झाल्याने शेवगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post