दिलासादायक : एवढे नगरकर कोरोना मुक्त

 


*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९१ टक्के*

*आज १५८ रूग्णांना डिस्चार्ज तर ११६ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर*
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: जिल्ह्यात आज १५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार २९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत  ११६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०८० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३० आणि अँटीजेन चाचणीत ५७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, अकोले ०२, कोपर गाव ०१, नेवासा ०३, पारनेर ०४,  पाथर्डी ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०२,  पाथर्डी ०१, राहाता ०४, राहुरी ०२,  संगमनेर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ५७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १०, अकोले ०३, कर्जत ०३, नेवासा ०२, पाथर्डी १३, राहाता ०७, संगमनेर १३, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०१ आणि श्रीरामपुर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ३३, अकोले ०२, जामखेड ०३, कर्जत ०४, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण १०, नेवासा ०१, पारनेर ०६,  पाथर्डी २२, राहाता १५, राहुरी ०६, संगमनेर ३५, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०२, इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:६६२९१*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: १०८०*

*मृत्यू:१०३६*

*एकूण रूग्ण संख्या:६८४०७*

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post