कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल? आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल? कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी? मकर राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल? वाचा...

माय अहमदनगर वेब टीम

गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२०. चंद्र शनीचे स्वामीत्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करेल. चंद्र आणि शनी एकाच राशीत असतील. या दोन्ही ग्रहांच्या प्रभावामुळे पाच राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस अत्यंत शुभ असल्याचे सांगितले जात आहे. काही राशींना सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल. तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घेऊया...

आजचे मराठी पंचांग : गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२०

मेष : विवाहाची बोलणी पुढे सरकतील. नोकरीत कामावर लक्ष केंद्रीत करावे. कौटुंबिक पातळीवर काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेवर भर राहील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याचा प्राधान्याने प्रयत्न करावा.

वृषभ : भावंडांचा सल्ला मोलाचा ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी. दिवसभरात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. व्यवहार करताना सावधानता बाळगावी. प्रलंबित महत्त्वाची कामे मार्गी लावण्यावर भर द्यावा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा, विचार-विनिमय होऊ शकेल.

मिथुन : अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे. व्यवहारात सावधगिरी बाळगा. आर्थिक आघाडीवरील चिंता वाढवणारा दिवस. आर्थिक व्यवहार करताना सर्व बाबी तपासणे हिताचे ठरेल. कर्जाऊ व्यवहार लांबणीवर टाकावेत. अन्यथा नुकसान संभवते.

कर्क : उत्तम संधी उपलब्ध होतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. उपलब्ध झालेल्या संधीचे सोने करणे आपल्या हातात राहील. व्यापारी वर्गाच्या चिंतेत भर पडू शकेल. नवीन व्यवसायिक योजनांवर भर राहील.

सिंह : समस्यांचे निराकरण शक्य. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक वार्ता मिळू शकतील. एखाद्या वादाचे निराकरण होऊ शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात अधिक मेहनत व परिश्रम घ्यावे लागतील.

कन्या : वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. प्रलंबित कामे मार्गी पूर्ण करण्यावर भर द्यावा. नेतृत्व क्षमता वृद्धिंगत होईल. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल. एखाद्याला मदत करायला जाल आणि आपली कामे प्रलंबित राहू शकतील.

तुळ : कुटुंबातील सदस्याची चिंता लागून राहील. महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. वैयक्तिक खर्चात वाढ होण्याची शक्यता. कौटुंबिक पातळीवर मतभेद होण्याची शक्यता. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावेत. सामाजिक पातळीवर प्रतिमा मलीन होणार नाही, याची काळजी घ्यावी.

वृश्चिक : रोजगारासाठीचे प्रयश्न यशस्वी होतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. न बोलून केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. कामकाजात केलेली सुधारणा लाभदायक ठरेल. त्यातून सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील. हितशत्रू व विरोधकांना आयती संधी मिळेल, असे कृत्य टाळणे हिताचे ठरेल.

धनु : मध्यस्थी यशस्वी होईल. कार्यक्षेत्रात बदल होण्याचे संकेत. एखादे महत्त्वाचे हाती घेतलेले काम किंवा प्रकल्प मार्गी लागेल. खर्चात भर पडण्याची शक्यता. कार्यक्षेत्रात झालेले बदल आपल्यासाठी सकारात्मक ठरू शकतील. सारासार विचार करूनच अंतिम निर्णयापर्यंत पोहोचावे

मकर : जबाबदारी वाढेल. कामात निष्काळजीपणा करू नये. प्रलंबित कामे प्राधान्याने मार्गी लावावीत. नवनवीन उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. वितरण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना लाभदायक दिवस. दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल असेल.

कुंभ : हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. वैवाहिक जीवन सुखमय असेल. सामाजिक प्रतिमा सुधारेल. आप्तेष्ट किंवा नातेवाईक यांच्यात आर्थिक व्यवहार न करणे हिताचे ठरेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. त्यातून कीर्ती, मान, सन्मान वृद्धिंगत होतील.

मीन : मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. कार्यक्षेत्रातील वातावरण अनुकूल राहील. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. आजचा दिवस दिलासादायक ठरेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. खरेदीवर भर राहील. दिवसाच्या उत्तरार्धात एखाद्या सामाजिक वा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संदी मिळू शकेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post