अमेरिकेत सत्तांतर होणार? बायडन यांची निर्णायक आघाडी

 माय अहमदनगर वेब टीम

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचे प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटीतटीची लढत सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी निर्णायक आघाडी घेतली असून विजयासमीप ते पोहचले आहेत. जाणून घेऊयात अमेरिकेच्या निवडणूक निकालाचे लाइव्ह अपडेट्स:

अमेरिकेत सत्तांतर होणार


>>> लाइव्ह अपडेट्स:


>> पाहा: अमेरिकेतील राज्यनिहाय निकालाचे लाइव्ह अपडेट्स


>> अमेरिकेत सत्तांतर होणार? बायडन यांची निर्णायक आघाडी


>> बायडन यांचा ट्रम्प यांना आणखी एक धक्का; मिशिगनमध्येही मिळवला विजय


>> बायडन यांचा एरिजोनामध्ये विजय; ११ इलेक्टोरल मते मिळाली


>> विस्कॉन्सिनमध्ये आघाडीनंतर बायडन यांचा विजय; १० इलेक्टोरल मतांची भर


>> अमेरिकेतील अध्यक्षपदाचे उमेदवार व्हाईट हाउसच्या जवळ, बायडन यांचा विस्कॉन्सिस आणि मिशिगनमध्ये विजय


>> विस्कॉन्सिनमध्ये बायडन यांच्या विजयाने डोनाल्ड ट्रम्प असमाधानी. विस्कॉन्सिनच्या अनेक भागांतील मतमोजणीत गडबड झाल्याचं वृत्त आहे. यामुळे निकालावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे पुन्हा मतमोजणी करण्याची ट्रम्प यांची मागणी


>> प्रत्येक ठिकाणी बायडन यांना मते मिळत आहेत. पेन्सिलवेनिया, विस्कॉन्सिन आणि मिशिगन येथे त्यांना मते मिळत आहेत. हे देशासाठी खूप वाईट घडतंयः डोनाल्ड ट्रम्प 


>> मतमोजणीवर शंका घेणारे ट्रम्प यांचे ट्विट- कालपर्यंत महत्त्वाच्या राज्यांमध्ये आपण आघाडीवर होतो. पण बॅलेट मोजणीने ही आघाडी हळूहळू धक्कादयकपणे कमी होत गेली. मतदान सर्वेक्षक हे चुकीचं असल्याचं मानत आहेत.


>> मेल बॅलेटची मोजणी कशी होतेय, हे मेल बॅलेट मोठ्या संख्येत आणि त्यांची क्षमता विद्ध्वंसक आहेः ट्रम्प


>> आता ट्रम्प पिछाडीवर, बायडन यांची मोठी आघाडी. ५३८ पैकी बायडन २३८ तर ट्रम्प २१३ वर 


>> मतमोजणीत सध्या तरी ट्रम्प आघाडीवर, बायडन यांची पिछाडी


>> जॉर्जिया मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना, पेनिस्लेवेनिया, विस्कॉन्सिन या राज्यांमधील निकाल येणं बाकी


>> डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदान रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची घोषणा केलीय, तर बायडन यांच्या प्रचार व्यवस्थापकाने हे वक्तव्य प्रक्षोभक, अभूतपूर्व आणि चुकीचे असल्याचं म्हटलंय. बायडन कुठल्याही लढाईसाठी तयार > बायडन विरुद्ध ट्रम्प सामना सुप्रीम कोर्टात? ट्रम्प यांनी मतमोजणीत गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बायडन यांच्या कायदेशीर टीमने कोर्टातील लढाईस सज्ज असल्याचे म्हटले आहे.


>> वाचा: मतमोजणीत गोंधळ; सुप्रीम कोर्टात दाद मागणार: ट्रम्प


> पेन्सिलवेनियामध्ये मतमोजणी थांबवण्यात आल्याचे वृत्त


> वाचा: पिछाडीनंतर ट्रम्प यांची मुसंडी; 'या' राज्यांवर आहे नजर!


> निवडणुकीत आमचा विजय निश्चित, पराभवाच्या भीतीने आता बायडन कोर्टात जाण्याची तयारी करत आहेत; ट्र्म्प यांचा आरोप


> वाचा: Explained: पुढचा राष्ट्राध्यक्ष ठरवणार भारत-अमेरिका संबंध?


> निवडणूक आम्हीच जिंकणार, ट्रम्प यांनी व्यक्त केला विश्वास


> वाचा: अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष कोण? मतदारांसाठी ठरले 'हे' महत्त्वाचे मुद्दे


> टेक्सासमध्ये अटीतटीचा सामना; बायडन यांना ४९.९९ मते, ट्रम्प यांना ४८.७० टक्के मतदान


> ओहियो, नॉर्थ कॅरिलोना आणि पेन्सिलवेनियामध्ये जो बायडन यांच्याकडे निर्णायक आघाडी


> फ्लोरिडा आणि मिशिगन या राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर


> बायडन यांच्यासाठी जॉर्जिया, फ्लोरिडा आणि उत्तर कॅरिलोना या राज्यामधील कौल महत्त्वाचा; या राज्यात विजय मिळवल्यास ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता 


> मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊस परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post