शरीरासाठी व्हिटॅमिन सी का असते आवश्यक? अधिक सेवन केल्यास आरोग्यावर होऊ शकतात हे दुष्परिणाम




माय अहमदनगर वेब टीम

हेल्थ डेस्क - ‘व्हिटॅमिन सी’चा आपल्या आरोग्याला योग्य प्रमाणात पुरवठा होणे अतिशय आवश्यक आहे. या जीवनसत्त्वास एस्कॉर्बिक अ‍ॅसिड असंही म्हटलं जातं. फळे आणि भाज्यांच्या सेवनाद्वारे आपल्या शरीराला नैसर्गिक स्वरुपात ‘व्हिटॅमिन सी’ मिळते.

संत्रे, स्ट्रॉबेरी, कीवी, ब्रोकोली किंवा पालक यासारख्या फळ आणि भाज्यांमध्ये 'व्हिटॅमिन सी'ची मात्रा भरपूर असते.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार 'व्हिटॅमिन सी'मुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि यामुळे संसर्गाविरोधात लढण्यास आपल्याला मदत मिळते. शरीरात या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाल्यास आजारांची लागण होण्याची शक्यता असते. पण ‘व्हिटॅमिन सी’चे अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात. जास्त प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’युक्त पदार्थ खाल्ल्यास आरोग्यावर नेमके काय परिणाम होऊ शकतात? जाणून घ्या माहिती...

‘व्हिटॅमिन सी’मुळे शरीरावर कसे होतात परिणाम?

पोषक तत्त्वांचा साठा असल्याने ‘व्हिटॅमिन सी’ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात 'व्हिटॅमिन सी'चे सेवन केल्यास शरीरावर दुष्परिणाम होण्याचीही शक्यता असते. जर आपण नियमित एक हजार मिलीपेक्षा अधिक प्रमाणात 'व्हिटॅमिन सी'चे सेवन केले तर जुलाब, उलटी, छाती जळजळणे, पोटदुखी, डोकेदुखी आणि निद्रानाश यासारख्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. साधारणतः महिलांनी ७५ मिलीग्रॅम आणि पुरुषांनी ९० मिलीग्रॅम या प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’चे नियमित सेवन करावे.

शरीरासाठी ‘व्हिटॅमिन सी’ का आहे आवश्यक

कोलेजनचे उत्पादन वाढवण्यामध्ये व्हिटॅमिन सी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. व्हिटॅमिन सीमुळे सांध्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. सोबत शारीरिक जखमा देखील जलदगतीने ठीक होतात. याव्यतिरिक्त अन्य शारीरिक कार्यप्रणाली सुरुळीत सुरू राहण्यासाठीही व्हिटॅमिन सी आवश्यक आहे.

​रक्तदाब नियंत्रणात राहतं

‘व्हिटॅमिन सी’मुळे रक्तवाहिन्यांचे कार्य अडथळ्याविना सुरू राहते. हृदयाला योग्य पद्धतीने रक्ताचा पुरवठा देखील होतो. यामुळे रक्तदाबाची समस्याही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन सीच्या सेवनामुळे वयोवृद्धांमधील सिस्टोलिक ब्लड प्रेशर कमी होतं. यामुळे स्ट्रोक किंवा हृदयाशी संबंधित अन्य समस्यांचाही धोका कमी होतो.

​तणाव कमी होतो

शरीरामध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता निर्माण झाल्यास तणावाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. योग्य प्रमाणात व्हिटॅमिन सी युक्त आहाराचे सेवन केल्यास तणाव कमी होण्यास मदत मिळते आणि आरोग्य निरोगी देखील राहते.





0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post