चंद्राचा वृषभ प्रवेश : 'या' ९ राशींना उत्तम दिवस; आजचे राशीभविष्य

 


माय अहमदनगर वेब टीम

सोमवार, ३० नोव्हेंबर २०२०. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी चंद्र शुक्राचे स्वामीत्व असलेल्या वृषभ राशीत विराजमान असेल. आज कार्तिक म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा असून, तुलसी विवाह समाप्ती आहे. तसेच गुरु नानक जयंती आणि चंद्रग्रहणही आहे. एकूणच ग्रहमान पाहता तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकतील? जाणून घेऊया..

मेष : चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. विशेष मान, सन्मान मिळतील. शक्य नसल्यास खोटी आश्वासने इतरांना देऊ नका. अधिकाराचा योग्य वापर करा. मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा महत्त्वाचा करार होण्याची शक्यता. भौतिक विकासाचे उत्तम योग जुळून येतील.

वृषभ : नवीन योजनांवर भर द्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. गोंधळलेल्या अवस्थेत शांत होऊन विचार करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. न्यायालयीन प्रकरणात सकारात्मक वार्ता मिळू शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात पराक्रमात वाढ होईल. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील. मनोकामना पूर्ण होऊ शकतील.

मिथुन : रचनात्मक कार्यात दिवस जाईल. आवडीचे काम करायला मिळेल. जुन्या अडकलेल्या पैशाचे व्यवहार मार्गी लावा. घरातील मोठ्यांचा आदर करा. नवीन योजनांवर भर राहील. अधिकारी वर्गाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल.

कर्क : प्रलंबित कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. जवळच्या व्यक्तीकडून आपण फसत नाही ना याचा अंदाज घेऊन पुढे जा. सृजनात्मक कामाची आवड निर्माण होईल. त्यातच दिवस व्यतीत होऊ शकेल. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. कार्यालायातील वातावरण अनुकूल असेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल.

सिंह : दिनक्रम व्यस्त राहू शकेल. आध्यात्मिक आवड वाढील लागेल. नोकरीत-व्यवसायात आपल्या कामाच्या संदर्भात प्रशंसा होईल. घरातील अधिकार काळजीपूर्वक वापरा. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करावे. कार्यक्षेत्रात अधिकारी वर्गामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. दिवसाचा उत्तरार्ध मौज-मजा, हास्य-विनोदात व्यतीत होईल.

कन्या : वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. आत्मविश्वासाने कार्यरत राहावे. अनोळखी आजारांना वेळीच बाजूला सारा. छोटे प्रवास घडतील. वार्ता सारगर्भित ठेवा. रागावर नियंत्रण ठेवावे. प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, संयम बाळगणे हिताचे ठरेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल असेल.

तुळ : नवीन प्रकल्पाचा शुभारंभ होऊ शकेल. जुने वाद मिटू शकतील. आपल्या छानशौकीवर आपला दिवस आनंदात घालवाल. अतितिखट पदार्थांचे सेवन कमी ठेवा. आजचा दिवस लाभदायक ठरू शकेल. संपत्तीच्या संदर्भात काही कौटुंबिक समस्या उद्भूवू शकतील. कार्यक्षेत्रातील वातावरण अनुकूल राहील.

वृश्चिक : सुख, शांतता अनुभवाल. नोकरदार वर्गाला उत्तम दिवस. सामाजिक क्षेत्रात उत्तम अधिकार प्राप्त होतील. भागीदारीत योग्य मोबदला पदरात पडेल. आजचा दिवस उत्तम असेल. दिवसभरात चांगली संधी उपलब्ध होऊ शकेल. कौटुंबिक वातावरण उत्साही आणि आनंदी राहील. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.

धनु : सावधगिरी बाळगून व्यवहार करावेत. उत्तम संधी उपलब्ध होतील. संधीचे सोने करणे आपल्या हातात राहील. आहारातील पथ्ये ना चुकता पाळा. मित्रांकडून फायदा होईल. व्यवसायात जोखीम पत्करणे लाभदायक ठरेल. दैनंदिन कामात केलेला छोटासा बदल उपयुक्त ठरू शकेल. आप्तेष्टांसाठी पैशांची सोय करावी लागू शकेल.

मकर : भागीदारीतील व्यापारातून फायदा मिळेल. महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. जोडीदाराशी मैत्रीपूर्वक व्यवहार करा. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल. व्यापारी वर्गाला चांगला फायदा मिळू शकेल. प्रलंबित कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहावे. नियमांचे पालन करावे. दिवसाचा उत्तरार्ध व्यस्त राहू शकेल.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल. पथ्यपाणी, औषधे चुकवू नयेत. घाईने निर्णय घेऊ नका. कौटुंबिक गोष्टींवरन त्रागा करू नका. अस्वस्थतेला थारा देऊ नका. व्यापारी वर्गाला आजचा दिवस उत्तम लाभदायक ठरू शकेल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा.

मीन : धैर्य, संयमाने परिस्थिती हाताळावी. गरजूंना प्राधान्याने मदत करावी. वाट पाहात असलेले निर्णयाचे उत्तर मिळेल. आजचा दिवस लाभदायक ठरेल. व्यापारी वर्गाने जोखीम पत्करून केलेले व्यवहार लाभदायक ठरतील. बुद्धी, कौशल्याचा वापर करून हाती घेतलेली कामे पूर्णत्वास जाऊ शकतील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post