किंचितसा दिलासा; राज्यात करोना रुग्णसंख्येत ४२१ ने घट, मात्र मृत्यू वाढले

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई: करोना संसर्गाबाबत (Coronavirus Infection) काहीसे दिलासादायक वृत्त असून नव्या करोनाबाधितंचा आकडा किंचितसा कमी झाल्याचे ताज्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. आज दिवसभरात ५ हजार ५४४ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच गेल्या २४ तासांमध्ये ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालचा विचार करता काल दिवसभरात एकूण ५ हजार ९६५ इतके नवे रुग्ण सापडले, तर एकूण ७५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज दिवसभरात एकूण ४ हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी एकूण १६ लाख ८० हजार ९२६ रुग्ण बरे झालेले आहेत. याबरोबरच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

कालच्या तुलनेत आज ४२१ रुग्ण कमी आढळल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात दिवाळीनंतर करोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत असताना काल पासून या आकड्यात घट होताना दिसत आहे. राज्यातील जनतेसाठी हे दिलासा देणारे वृत्त आहे. मात्र कालच्या तुलनेत मृत्यू काहीसे अधिक झाले आहेत. कालची तुलना केल्यास मत्यूमध्ये आज १० रुग्ण अधिक दगावले आहेत. 

आज प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.५९ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. या बरोबरच राज्यात ५ लाख २६ हजार ५५५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून एकूण ६ हजार ८१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटीनमध्ये आहेत. दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०८,०४,४२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,२०,०५९ (१६.८५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post